(प्रतिनिधी पिंपरी, दि. १९ जून 🙂 स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेने धडक कारवाई मोहीम राबवत विविध भागांत एकूण ४४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे, बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणे आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे अशा प्रकारांवर ही कारवाई करण्यात (PCMC Cleanliness Drive)आली.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग व ग्रीन मार्शल पथकाने ही विशेष मोहीम (PCMC Cleanliness Drive)राबविली.
रहाटणी-थेरगाव परिसरात सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या एका टेम्पोवर कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. विशेष तपासणीदरम्यान संबंधित वाहनातून कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात(PCMC Cleanliness Drive) आली.
रावेत परिसरात एका व्यावसायिक आस्थापनाकडून कचरा जाळला जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे होणारे वायू प्रदूषण आणि आरोग्यावरील दुष्परिणाम लक्षात घेऊन संबंधित आस्थापनावर २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात (PCMC Cleanliness Drive)आला.
दरम्यान, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आरोग्य निरीक्षक क्षितिज रोकडे आणि ग्रीन मार्शल पथकाने प्रभाग क्रमांक ८ मधील भाजी मंडई परिसरात विशेष मोहीम राबविली. बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे आणि अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कारवाई करत १४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सुमारे १० किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले. याशिवाय प्लास्टिकबंदीचे उल्लंघन करणाऱ्या आणखी एका प्रकरणात ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात(PCMC Cleanliness Drive) आला.
उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी कचरा उघड्यावर टाकणे किंवा जाळणे यामुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले. स्वच्छ सर्वेक्षण आणि स्वच्छ शहराच्या उद्दिष्टपूर्तीसाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात नियमितपणे कठोर कारवाई सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट (PCMC Cleanliness Drive)केले.
महापालिकेने नागरिकांना ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजी आवश्यक असलेल्या कचऱ्याचे योग्य विलगीकरण करून तो घंटागाडीमार्फतच देण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा आस्थापनांची माहिती महापालिकेला देऊन स्वच्छ शहर अभियानात सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले( PCMC Cleanliness Drive)आहे.
