Home आरोग्य PCMC Property Tax Recovery:पिंपरी-चिंचवडमध्ये थकीत मिळकतकरावर महापालिकेचा दणका; ३५ हजार मिळकतधारकांना नोटिसा, १ जुलैपासून जप्तीची कारवाई

PCMC Property Tax Recovery:पिंपरी-चिंचवडमध्ये थकीत मिळकतकरावर महापालिकेचा दणका; ३५ हजार मिळकतधारकांना नोटिसा, १ जुलैपासून जप्तीची कारवाई

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ३५ हजार थकीत मिळकतकर धारकांना नोटिसा. ३० जूनपर्यंत सवलतीची संधी, १ जुलैपासून मालमत्ता जप्ती व पाणी कनेक्शन तोडण्याची कारवाई.

by Admin
Spread the love

(प्रतिनिधी ‘पिंपरी, दि. १९ जून ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने थकीत मिळकतकर वसुलीसाठी मोठी मोहीम हाती घेतली असून शहरातील सुमारे ३५ हजार मोठ्या थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. नवीन आर्थिक वर्षाची (२०२६-२७) मिळकतकर बिले घरपोच देताना थकबाकीदारांना या नोटिसाही दिल्या जात (PCMC Property Tax Recovery )आहेत.

 

महापालिकेने ३० जून २०२६ पर्यंत कर भरणाऱ्यांसाठी सामान्य करात ५ ते १० टक्क्यांपर्यंत सवलत जाहीर केली आहे. तसेच महिला, दिव्यांग आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या नावावरील मालमत्तांसाठी विशेष सवलतीही लागू आहेत. या मुदतीपूर्वी कर भरून सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले(PCMC Property Tax Recovery ) आहे.

 

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १ जुलैपासून विशेष वसुली पथके कार्यरत होणार आहेत. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या मिळकतधारकांविरुद्ध मालमत्ता जप्ती, निवासी मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडित करणे तसेच इतर कायदेशीर कारवाई केली जाणार (PCMC Property Tax Recovery )आहे.

 

दरम्यान, सुमारे २.५२ कोटी रुपयांचे २७५ हून अधिक धनादेश बाऊन्स झाल्याचे समोर आले असून संबंधितांना यापुढे ऑनलाइन किंवा रोखीनेच कर भरावा लागणार (PCMC Property Tax Recovery )आहे.

 

शहरात ७ लाख ८४ हजारांहून अधिक नोंदणीकृत मिळकती असून मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. त्यामुळे विकासकामांसाठी आवश्यक महसूल वेळेत उपलब्ध व्हावा, यासाठी थकबाकी वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले(PCMC Property Tax Recovery ) आहे.

 

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “मालमत्ताधारकांनी ३० जूनपूर्वी कर भरून उपलब्ध सवलतींचा लाभ घ्यावा. त्यानंतर थकबाकीदारांविरुद्ध जप्तीसह कठोर कायदेशीर कारवाई करण्यात (PCMC Property Tax Recovery )येईल.”


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00