प्रतिनिधी:चिंचवड लिंक रोडवरील टाइल्सच्या दुकान मालकावर धारदार शस्त्राने हल्ला करून ३ लाख ८० हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात काही तासांतच टिप देणारा कामगार आणि हल्ला करणाऱ्या टोळीला पिंपरी–चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी (Tiles Shop Robbery) पथकाने बेड्या ठोकल्या.
या प्रकरणी यश रमेश अंधारे (१८, रा. बोऱ्हाडे बिल्डिंग, चांदणी चौक, थेरगाव गावठाण), रितेश मुकेश चव्हाण (१८, रा. जगताप नगर क्र. ४ व ५, थेरगाव), रुपेंद्र रुपबसंत बैद (१९, रा. सुभाष नगर झोपडपट्टी, रिव्हर रोड, आंबेडकर कॉलनी, पिंपरी) तसेच एक विधिसंघर्षित बालक यांना थेरगाव स्मशानभूमीजवळून ताब्यात घेण्यात (Tiles Shop Robbery) आले.
पिंपरी–चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ९.५० वाजता श्रीजी सिरॅमिक्स, केशवनगर, चिंचवड येथे दुकानदार दीपक नरसाना यांच्या दुकानाबाहेर आशिष अरजनभा बुवा थांबले असताना चार जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून आरोपी पसार झाले. या टोळीने हत्यारांचा धाक (Tiles Shop Robbery) दाखवून परिसरात दहशत पसरवली होती.
घटनेनंतर गुंडा स्क्वॉडच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे या आरोपींचा शोध घेऊन थेरगाव स्मशानभूमीजवळ त्यांना (Tiles Shop Robbery) अटक केली.
दहशत निर्माण केलेल्या ठिकाणी आरोपींची धिंड
गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच आरोपींना पकडणाऱ्या गुंडा स्क्वॉडने, आरोपींनी केशवनगर परिसरात व्यापाऱ्यावर हल्ला केलेल्या ठिकाणीच त्यांची धिंड काढत समाजामध्ये निर्माण झालेली दहशत मोडून (Tiles Shop Robbery) काढली.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे, प्रविणकुमार तापकीर, सहायक फौजदार ठोकळ, विक्रम जगदाळे, अमित गायकवाड, हवालदार गणेश मेदगे, गंगाराम चव्हाण, विजय गंभीरे, सुनील चौधरी, मयुर दळवी, विजय तेलेवार, शाम बाबा, नितीन गैंगजे तसेच शिपाई रामदास मोहीते, विजय वेळापुरे, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी आणि तौसिफ शेख (Tiles Shop Robbery) यांच्या पथकाने केली.
