प्रतिनिधी:पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवरील हरकती आणि सूचनांवर तात्काळ कार्यवाही करून त्या निकाली काढाव्यात, असे स्पष्ट निर्देश आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी (PCMC Voter List) दिले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत माजी महापौर मधूकर पवळे सभागृहात प्रारूप मतदार यादीवरील हरकती–सूचना, मतदान केंद्र निश्चिती, दुबार नावे तपासणी आदी निवडणूकपूर्व कामकाजाचा आढावा आयुक्त हार्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शन करत (PCMC Voter List) होते.
बैठकीला अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, नगर सचिव मुकेश कोळप, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सह-कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत शिंपी, महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, डॉ. प्रदीप ठेंगल, सिताराम बहुरे, संदीप खोत, पंकज पाटील, व्यंकटेश दुर्वास, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे, तानाजी नरळे, पूजा दूधनाळे, अश्विनी गायकवाड, राजाराम सरगर तसेच प्रशासकीय अधिकारी सरिता मारणे, संगीता बांगर, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, कार्यालय अधीक्षक रमेश यादव आणि निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी–कर्मचारी उपस्थित (PCMC Voter List) होते.
नागरिकांची नावे मतदार यादीत योग्यरित्या समाविष्ट होणे, दुबार नोंदणी टाळणे आणि पात्र मतदारांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे सांगून आयुक्त हार्डीकर म्हणाले की, प्रारूप मतदार यादीवरील प्रत्येक हरकत आणि सूचनांची सखोल छाननी करून तांत्रिक अचूकतेसह त्यावर कार्यवाही करावी. मतदान केंद्रांची निश्चिती, तात्पुरत्या मतदान केंद्रांची गरज, सुलभ सुविधांची उपलब्धता आणि क्षेत्रनिहाय मतदारसंख्येचे विश्लेषण याबाबतही अधिकारी सजग राहून नियोजनबद्ध (PCMC Voter List) तयारी करावी.
निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून मतदान केंद्रांच्या स्थळांची निश्चिती, निवडणूक कक्ष अधिकारी नियुक्ती, दिव्यांगांसाठी उपलब्ध सुविधा, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ईव्हीएमची सुरक्षितता, अद्ययावत मतदार यादी, प्रभागांतील आवश्यक पायाभूत सुविधा दुरुस्ती, जनजागृती मोहीम आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देशही आयुक्तांनी (PCMC Voter List) दिले.
महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांवर तातडीने आणि काटेकोरपणे कार्यवाही सुरू असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी स्पष्ट केले. नागरिकांकडून आलेल्या प्रत्येक अर्जावर संबंधित अधिकारी प्राधान्याने कार्यवाही करत असल्याचे (PCMC Voter List) त्यांनी सांगितले.
