Home मनोरंजन Ravet Leopard:रावेतमध्ये AI बिबट्याची धडाकेबाज एन्ट्री!

Ravet Leopard:रावेतमध्ये AI बिबट्याची धडाकेबाज एन्ट्री!

जंगलात खळबळ – हत्ती, हरीण, ससा, मोर सगळेच भेटायला रांगेत!

by Admin
Spread the love

(विवेक कुलकर्णी )रावेतमध्ये सकाळीच “बिबट्या दिसला” अशी बातमी आली.

गावकऱ्यांनी भांड्यांचे झाकणं लावली, चहाची कपं खाली ठेवली आणि थेट मोबाईलवर फोटो शोधायला सुरुवात केली.
आणि मग कळलं  (Ravet leopard)हा बिबट्या AI generated आहे!

पण अफवा इतकी तुफान पसरली की जंगलातल्या प्राण्यांनाही वाटलं,
“अरे वा, आपल्या सोबत कुणीतरी नवीन सेलिब्रिटी आलाय!”

हत्ती म्हणाला:
“मला देखील भेटून यायचं, अखेर माझ्या वजनाला तोडीचा कुणीतरी आहे का ते बघू.”

हत्ती निघाला तसं मागून हरीण धावत आलं,
“फोटोमध्ये बघितलं… बिबट्या खूपच ग्लॅमरस दिसतोय! इंस्टाग्रामवर व्हायरल होईल, मी पण फोटो काढून  (Ravet Leopard )टाकणार!”

ते दोघे निघाले तसं मोराने शेपूट पसरवलं आणि म्हणाला,
“मी तर त्याला नाच शिकवणार. AI असला तरी कला तरी शिकायला हवी!”

ससा मात्र थोडा टेन्शनमध्ये.
“AI ना? मग त्याचं काहीही होऊ शकतं. आपल्याला ओळखेल का? आपलं खरं चेहऱ्याचं स्कॅन करेल का?”
असं म्हणत म्हणत तो स्वतःच कॅमेरा-रेडी पोझ घेऊन बसला.

जंगलातील सर्व प्राणी एका रांगेत रावेतमध्ये पोहोचले.
लोकांनी बघितलं तर रस्त्यावर एनिमल परेड!
कुणीतरी विचारलं,
“इथे काय (Ravet Leopard) चाललंय?”

समोरून उत्तर आलं:
“AI बिबट्या दर्शन!”

दरम्यान, बिबट्या-निर्मित केलेल्या AI ग्राफिक्सचा फोटो एका दुकानात मोठ्या पोस्टरवर लावला होता.
हत्ती जवळ जाऊन म्हणाला,
“अरे देवा… हा तर प्रिंटआउट आहे!”
हरीण म्हणालं,
“सेल्फी काढायचा तर फिल्टर तरी लावला असता!”

मोराने त्याला नमस्कार केला आणि म्हणाला,
“तू डिजिटल असलास तरी आम्हाला नाही रे काही अडचण. आमचं प्रेम 4K.”

शेवटी वनविभागाचा अधिकारी आला आणि सर्वांना शांत केलं:
“बिबट्या प्रत्यक्षात नाही, तो संगणकातच आहे.”
यावर ससा म्हणाला,
“म्हणजे मग घाबरायचं नाही तर रिफ्रेश करायचं?”

लोकांनी प्राण्यांसोबत मिळून AI बिबट्या महोत्सव 2025 ची घोषणा केली—
ज्यात स्पर्धा असणार:

  • बेस्ट AI बिबट्या फिल्टर

  • बिबट्या इमोजी मॅराथॉन

  • आणि हत्तीचा व्हर्च्युअल सेल्फी पुरस्कार!

अखेर या अफवेने बिबट्या आला नाही…
पण फुल ऑन मनोरंजन तर (Ravet Leopard) नक्कीच आणली


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00