Home माझं पिंपरी चिंचवड Pcmc Property Tax:पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ता कर संकलन ४१२ कोटींवर; सवलतींचा लाभ घेण्यासाठी शेवटचे ८ दिवस

Pcmc Property Tax:पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ता कर संकलन ४१२ कोटींवर; सवलतींचा लाभ घेण्यासाठी शेवटचे ८ दिवस

पिंपरी-चिंचवड महापालिकेने १ एप्रिल ते २२ जून २०२६ या कालावधीत ४१२.९७ कोटी रुपयांचे मालमत्ता कर संकलन केले. ३ लाखांहून अधिक नागरिकांनी ऑनलाइन कर भरत १०% सवलतीचा लाभ घेतला असून ३० जून ही अंतिम मुदत आहे.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी दि. २२ जून) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये मालमत्ता कर संकलनाचा ४१२.९७ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. १ एप्रिल ते २२ जून या कालावधीत ३ लाख ६५ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरला असून, त्यापैकी ३ लाखांहून अधिक नागरिकांनी ऑनलाइन कर भरत १० टक्के सवलतीचा लाभ घेतला (Pcmc Property Tax) आहे.

 

महापालिकेच्या १८ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वाकड विभागाने सर्वाधिक ५६.३९ कोटी रुपयांचा कर संकलित केला असून, थेरगाव (३७.६६ कोटी), कस्पटे वस्ती (३२.९१ कोटी) आणि किवळे (३०.३८ कोटी) विभागांचा त्यापाठोपाठ क्रमांक(Pcmc Property Tax) लागतो.

 

महापालिकेकडून ऑनलाइन कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर १० टक्के सवलत देण्यात येत असून, या सवलतीचा लाभ घेण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ आहे. त्यामुळे उपलब्ध सवलतींचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता तातडीने कर भरणा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले (Pcmc Property Tax) आहे.

 

नागरिकांच्या सोयीसाठी सर्व विभागीय कार्यालयांतील मालमत्ता कर काउंटर शनिवार व रविवारीही सुरू ठेवण्यात आले (Pcmc Property Tax) आहेत.

 

महापौर रवि लांडगे यांनी वेळेत कर भरणाऱ्या नागरिकांमुळे शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देता येत असल्याचे सांगितले. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मालमत्ता कर हा महापालिकेच्या महसुलाचा प्रमुख स्रोत असल्याचे नमूद करत नागरिकांनी ३० जूनपूर्वी कर भरून सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन किंवा जवळच्या विभागीय कार्यालयात कर भरण्याचे आवाहन(Pcmc Property Tax) केले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00