(विवेक कुलकर्णी)IPL 2026 मधील LSG vs KKR सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सुपर ओव्हरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सवर रोमांचक विजय मिळवला. रिंकू सिंहचे नाबाद 83 धावा आणि विजयी चौकार तर सामन्यात क्षेत्ररक्षण करताना घेतलेले 5 झेल , तर सुनील नरेनची भेदक गोलंदाजी ठरली (Kkr vs Lsg Ipl2026)निर्णायक
आयपीएल २०२६ मधील २६ एप्रिल रोजी झालेला लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना क्रिकेट चाहत्यांसाठी रोमांचक ठरला. लखनऊच्या अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय (Kkr vs Lsg Ipl2026)मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत ७ बाद १५५ धावा केल्या. संघाच्या डावात रिंकू सिंहने जबरदस्त खेळी करत नाबाद ८३ धावा फटकावल्या आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. लखनऊकडून मोहसिन खानने भेदक गोलंदाजी करत ५ विकेट्स (Kkr vs Lsg Ipl2026)घेतल्या.
१५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सनेही २० षटकांत ८ बाद १५५ धावा केल्या आणि सामना बरोबरीत सोडवला. त्यामुळे निकालासाठी सुपर ओव्हरचा थरार(Kkr vs Lsg Ipl2026) रंगला.

सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनऊला केवळ १ धाव करता आली. कोलकाताकडून अनुभवी सुनील नरेनने अचूक गोलंदाजी करत १ धाव देऊन २ विकेट्स घेतल्या. विजयासाठी २ धावांचे सोपे लक्ष्य मिळाल्यानंतर कोलकाताच्या रिंकू सिंहने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत संघाला शानदार विजय मिळवून (Kkr vs Lsg Ipl2026)दिला.
या दमदार कामगिरीसाठी रिंकू सिंहला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्याने फलंदाजीत नाबाद ८३ धावा करताना संकटातून संघाला बाहेर काढले आणि सुपर ओव्हरमध्ये विजयी फटका मारत सामना (Kkr vs Lsg Ipl2026)संपवला.
या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्सने गुणतालिकेत ८ व्या स्थानावर झेप घेतली आहे. तर सलग पराभवामुळे लखनऊ सुपर जायंट्सचा संघ तळाच्या १० व्या स्थानावर घसरला आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता, मात्र शेवटच्या क्षणी कोलकाताने बाजी(Kkr vs Lsg Ipl2026) मारली.
