Home प्रेरणा / यशकथा Inner Wheel Club pimpri:इनरव्हील क्लब ऑफ पिंपरीला विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हास्तरीय पुरस्कार

Inner Wheel Club pimpri:इनरव्हील क्लब ऑफ पिंपरीला विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हास्तरीय पुरस्कार

२०२५-२६ मध्ये ७० समाजोपयोगी प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी; अध्यक्षा सविता इंगळे यांच्यासह संपूर्ण टीमचा गौरव

by Admin
Spread the love

(पिंपरी | प्रतिनिधी): इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१३ची डिस्ट्रिक्ट असेंबली नुकतीच पुणे येथे उत्साहात पार पडली. या वेळी २०२५-२६ या वर्षात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या विविध इनरव्हील क्लबांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये इनरव्हील क्लब ऑफ पिंपरीला विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात (Inner Wheel Club)आले.

२०२५-२६ या वर्षात क्लबच्या अध्यक्षा म्हणून सविता इंगळे यांनी नेतृत्व केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबने महिला सक्षमीकरण, युवा विकास, बालहक्क, महिलांचे स्थान, कुटुंब कल्याण तसेच इनरव्हील ब्रँडिंग अशा विविध क्षेत्रांत एकूण ७० प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत डिस्ट्रिक्ट असेंबलीमध्ये क्लबला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात (Inner Wheel Club)आले.

यावेळी सविता इंगळे म्हणाल्या, “इनरव्हील क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणे हा माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक अनुभव होता. या माध्यमातून समाजासाठी योगदान देण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. वर्षभर आम्ही विविध उपक्रम आणि प्रकल्प यशस्वीपणे राबवले. या वाटचालीत जिल्हाध्यक्ष डॉ. आशा देशपांडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. तसेच या यशाचे संपूर्ण श्रेय आमच्या क्लबच्या सर्व सदस्यांना जाते. त्यांच्या समर्पण, सहकार्य आणि सांघिक कार्यामुळेच हे यश शक्य झाले. वर्षभर दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी सर्व सदस्यांची मनःपूर्वक आभारी

(Inner Wheel Club)आहे.”

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00