निगडी, दि. २८ मे : “पारतंत्र्यातील राष्ट्र हे कायम दुबळे असते. जोपर्यंत ब्रिटिश या देशावर राज्य करतील, तोपर्यंत त्यांच्याविरोधात तीव्र प्रतिकार करणे हे प्रत्येक देशभक्ताचे कर्तव्य आहे, हा विचार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मांडला. स्वतःच्या सद्गुणांचा आणि विद्येचा उपयोग देशसेवेसाठी होत नसेल, तर अशा विद्येचा भार व्यर्थ आहे, या भावनेतून सावरकर अखेरपर्यंत देशसेवेत कार्यरत राहिले. लोकप्रियतेचा मोह बाजूला सारून देशासमोरील संकटांविषयी त्यांनी सातत्याने जनजागृती केली. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी देशापुढील विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले. स्वतंत्र भारतात राष्ट्रवादी विचारांची गर्जना सर्वप्रथम सावरकरांनीच केली,” असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक सौरभ देवीकर यांनी (Savarkar Jayanti) केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर पातळीवर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत विचार मंचाच्या वतीने स्वा. सावरकर उद्यान (गणेश तलाव) येथे हा भव्य कार्यक्रम पार (Savarkar Jayanti)पडला.
या कार्यक्रमात उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी नगरसेविका सुप्रिया चांदगुडे, नगरसेवक अमित गावडे, कुशाग्र कदम, प्रकाश क्षिरसागर, अरविंद वाडकर, शाहिर प्रकाश ढवळे, विश्वनाथ नायर आदी मान्यवर उपस्थित (Savarkar Jayanti) होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंचाचे निमंत्रक राजेंद्र घावटे यांनी प्रास्ताविक केले. भास्कर रिकामे व विश्वास करंदीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. हेमंत देवकुळे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. अध्यक्षीय मनोगतामध्ये विनोद बन्सल यांनी सावरकरांच्या राष्ट्रवादी विचारांचे महत्त्व अधोरेखित (Savarkar Jayanti) केले.
सौरभ देवीकर पुढे म्हणाले, “अंदमानातून रत्नागिरी येथे आल्यानंतर सावरकरांनी संपूर्ण जीवन हिंदू संघटन आणि सामाजिक ऐक्यासाठी समर्पित केले. स्वतंत्र भारत हा लोकशाही आणि प्रजासत्ताक तत्त्वांवर चालणारा देश असावा, तसेच भारताची वाटचाल विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ घटनेनुसार व्हावी, असा त्यांचा ठाम आग्रह (Savarkar Jayanti) होता.”
“प्रतिभासंपन्न साहित्यिक, प्रभावी वक्ते, ज्वलंत राष्ट्रभक्त, समाजसुधारक आणि संघटक असे सावरकरांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आजच्या तरुणांसमोर येणे आवश्यक आहे. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे ते एकमेव क्रांतिकारक होते. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी आदर्श मानले होते,” असेही देवीकर यांनी नमूद (Savarkar Jayanti) केले.
यावेळी उपस्थितांनी सावरकर जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने शहरातील दोन ठिकाणी तीन दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करण्याची मागणी केली. उपमहापौर व नगरसेवकांनी या मागणीला पाठिंबा देत योग्य नियोजनाचे आश्वासन (Savarkar Jayanti) दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र बाबर यांनी विशेष सहकार्य केले. संयोजनात योगेश निसळ, दीपक नलावडे, अतुल इनामदार आदींनी सहभाग घेतला. मुख्य संयोजक भास्कर रिकामे यांनी सूत्रसंचालन केले, तर सावरकर विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक विश्वास करंदीकर यांनी उपस्थितांचे आभार (Savarkar Jayanti) मानले.
