Home माझं पिंपरी चिंचवड Pradhikaran Senior Citizens:प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

Pradhikaran Senior Citizens:प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचा 35 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. जीवन गौरव पुरस्कार श्यामसुंदर परदेशी, सुभाष जोशी यांना तर सुभाष राणे, कुंदा कोळपकर, सुशीला पटांगरे यांचा गौरव.

by Admin
Spread the love

पिंपरी चिंचवड, दि. १९ एप्रिल २०२६ : प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक अतुल इनामदार होते. व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष आनंदराव मुळूक, प्रमुख पाहुणे अनिल दीक्षित, डॉ. गुणवंत चिखलीकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित (Pradhikaran Senior Citizens) होते.

 

यावेळी जीवन गौरव पुरस्कार श्यामसुंदर परदेशी आणि सुभाष जोशी यांना प्रदान करण्यात आला. आदर्श समाजसेवक पुरस्कार उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुभाष राणे, आदर्श माता पुरस्कार कुंदा कोळपकर, तर आदर्श समाजसेविका पुरस्कार सुशीला पटांगरे यांना देण्यात आला. परीक्षक म्हणून राजेंद्र घावटे आणि परशुराम शिंदे यांनी काम पाहिले. तसेच डॉ. गुणवंत चिखलीकर यांचा विशेष सन्मान करण्यात(Pradhikaran Senior Citizens) आला.

 

कार्यक्रमात अनिल दीक्षित यांनी सादर केलेल्या ‘झिंग झिंग झिंगाट’ या मनोरंजन कार्यक्रमाने उपस्थितांना मनमुराद हसवले. सूत्रसंचालन कुंदा कोळपकर व अलका बेल्हेकर यांनी केले. कार्याध्यक्ष दिलीप गोसावी यांनी आभार(Pradhikaran Senior Citizens) मानले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00