दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : गुणपत्रक व प्रमाणपत्रांचे वितरण २ जून रोजी
पुणे, ३१ मे २०२६ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेच्या गुणपत्रक, प्रमाणपत्र व इतर शालेय अभिलेखांच्या वितरणाबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला (SSC Result 2026) आहे.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, राज्यातील सर्व विभागीय मंडळांमार्फत मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना सोमवार, दि. २ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गुणपत्रक, प्रमाणपत्रे व तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख वितरित करण्यात येणार (SSC Result 2026)आहेत.
त्यानंतर संबंधित शाळांनी त्याच दिवशी दुपारी ३ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्रांचे वाटप करावे, असे निर्देश मंडळाने दिले (SSC Result 2026) आहेत.
राज्य मंडळाने सर्व विभागीय मंडळांना तसेच संबंधित माध्यमिक शाळांना आवश्यक नियोजन करून विद्यार्थ्यांपर्यंत कागदपत्रे वेळेत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे वेळेवर उपलब्ध होणार (SSC Result 2026) आहेत.
विद्यार्थी व पालकांनी संबंधित शाळांशी संपर्क साधून गुणपत्रक व प्रमाणपत्र वितरणाबाबतची माहिती घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले (SSC Result 2026) आहे.
