Home प्रेरणा / यशकथा Mata Ramai Memorial:त्यागमूर्ती माता रमाई स्मारकासाठीच्या संघर्षाला यश; भूमिपूजन उत्साहात संपन्न – मारुती भापकर

Mata Ramai Memorial:त्यागमूर्ती माता रमाई स्मारकासाठीच्या संघर्षाला यश; भूमिपूजन उत्साहात संपन्न – मारुती भापकर

पिंपरीतील त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाच्या भूमिपूजनानंतर सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी संघर्षाचा प्रवास, कार्यकर्त्यांचे योगदान आणि अजित पवार यांच्या भूमिकेचा गौरव केला.

by Admin
Spread the love

पिंपरी : त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाच्या उभारणीसाठी गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले असून स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले, अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी (Mata Ramai Memorial) दिली.

 

केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले आणि भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महापौर रवी लांडगे, आयुक्त विजय सूर्यवंशी, सभापती अभिषेक बारणे, उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेवक, पदाधिकारी तसेच आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित (Mata Ramai Memorialहोते.

 

भीमसृष्टी मागील पीएमपीएमएलची आरक्षित २३ गुंठे जागा माता रमाई स्मारकासाठी मिळावी, यासाठी गेली अनेक वर्षे विविध संघटनांनी आंदोलने, निवेदने, मोर्चे आणि सातत्याने पाठपुरावा केला होता. अनेक प्रशासकीय अडथळ्यांनंतर अखेर ही जागा स्मारकासाठी उपलब्ध(Mata Ramai Memorial झाली.

 

या प्रक्रियेत दिवंगत अजितदादा पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावत संबंधित यंत्रणांना जागा तातडीने वर्ग करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यांच्या सकारात्मक हस्तक्षेपामुळेच हे ऐतिहासिक काम मार्गी लागल्याची भावना मारुती भापकर यांनी व्यक्त (Mata Ramai Memorialकेली.

 

माता रमाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यासाठी दिलेला त्याग, संघर्ष आणि समर्पण भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. उभारण्यात येणारे हे स्मारक सामाजिक इतिहासाचे प्रतीक ठरेल. स्मारकाचे काम दर्जेदार, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही भापकर यांनी(Mata Ramai Memorial केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00