Home क्रीडा Amdar Cup 2026:आमदार चषक 2026 : उमा खापरे आणि जयदीप खापरे यांच्या पुढाकारातून निगडीत भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा

Amdar Cup 2026:आमदार चषक 2026 : उमा खापरे आणि जयदीप खापरे यांच्या पुढाकारातून निगडीत भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा

ज्ञान प्रबोधिनी मैदानावर ६५ संघांचा उत्स्फूर्त सहभाग; ग्रामीण खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या भव्य मैदानावर जिल्हास्तरीय “आमदार चषक २०२६” व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार आणि दिमाखदार आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील तसेच जिल्ह्यातील शाळांमधील होतकरू खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळावे, त्यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावे या दूरदृष्टीतून आमदार उमा खापरे यांच्या महत्त्वाकांक्षी क्रीडा उपक्रमातून ही स्पर्धा साकारण्यात (Amdar Cup 2026) आली.

ग्रासरूट्स क्रीडाकुल, पुणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन आणि आमदार उमा खापरे यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या स्पर्धेला खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल ६५ संघांनी सहभाग नोंदवत स्पर्धेची रंगत वाढवली. १० ते १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी दमदार खेळ, उत्कृष्ट समन्वय आणि जिद्दीचे दर्शन घडवत उपस्थितांची वाहवा (Amdar Cup 2026)मिळवली.

स्पर्धास्थळी उभारण्यात आलेल्या आकर्षक फलकांमुळे आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे संपूर्ण मैदानाला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते. दिवसभर सुरू असलेल्या सामन्यांमुळे परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक सामन्यात खेळाडूंचा उत्साह, पालकांचा जल्लोष आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद विशेष(Amdar Cup 2026) ठरला.

 

स्पर्धेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी आमदार उमा खापरे, य उपमहापौर शर्मिला बाबर, महापौर रवी लांडगे, केंद्रप्रमुख मनोज देवळेकर, क्रीडा सभापती कैलास कुटे, माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेविका शैलजा मोरे तसेच नगरसेवक अमित गावडे आणि युवा नेते जयदीप खापरे,अध्यक्ष प्राधिकरण चिंचवड पिंपरी चिंचवड भाजपा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेचा गौरव अधिक (Amdar Cup 2026) वाढला.

या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार उमा खापरे यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील गुणवंत खेळाडूंना समान संधी उपलब्ध करून देण्याचा प्रभावी संदेश दिला. “खेळातून व्यक्तिमत्त्व घडते, नेतृत्व विकसित होते आणि राष्ट्रासाठी योगदान देणारी पिढी तयार होते,” असा त्यांचा ठाम विश्वास आहे. युवकांनी खेळाकडे वळावे, स्पर्धात्मक वृत्ती जोपासावी आणि महाराष्ट्राचा झेंडा देशपातळीवर फडकवावा, ही त्यांची भूमिका या उपक्रमातून अधोरेखित(Amdar Cup 2026) झाली.

 

महिलांच्या नेतृत्वातून क्रीडा क्षेत्रात मोठे उपक्रम उभे राहू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणून आमदार उमा खापरे यांच्या या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. सामाजिक बांधिलकी, युवकांप्रती असलेली आस्था आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत (Amdar Cup 2026) आहे.

 

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात युवा नेते आणि उद्योजक जयदीप खापरे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण नियोजन, सुविधा, खेळाडूंसाठी आवश्यक व्यवस्था, वेळापत्रक, मैदान व्यवस्थापन आणि समन्वय या सर्व बाबींमध्ये त्यांनी स्वतः लक्ष घालत स्पर्धेला भव्यता प्राप्त करून दिली. त्यांच्या नेतृत्वामुळे स्पर्धा शिस्तबद्ध, दर्जेदार आणि संस्मरणीय (Amdar Cup 2026) ठरली.

 

युवकांसाठी दर्जेदार क्रीडा स्पर्धा सातत्याने आयोजित करून त्यांना संधी, दिशा आणि प्रेरणा देण्यासाठी आपण कायम तत्पर राहू, अशी ग्वाही जयदीप खापरे यांनी दिली. युवकांमध्ये संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी अशा स्पर्धा काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद (Amdar Cup 2026) केले.

 

१६ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात सह्याद्री स्पोर्ट्स क्लबने ज्ञानप्रबोधिनी संघावर २५-१८, २५-६ अशा दोन सरळ सेटमध्ये विजय मिळवत जेतेपद पटकावले. सह्याद्री स्पोर्ट्स क्लबकडून राजवीर भोसले, वंश खंडेलवाल, श्लोक कुळे, नंदवर्धन मोटे, ईशान कांबळे, झीशान शेख आणि अद्वैत गोडबोले यांनी शानदार खेळ केला. त्यांना कोच नारायण कोकरे यांचे मार्गदर्शन(Amdar Cup 2026) लाभले.

 

ज्ञानप्रबोधिनी संघाकडून शौर्य काळोखे, श्लोक दळवी, अथर्व, निखिल आणि दुष्यंत यांनी चांगली झुंज दिली. त्यांना कोच शंभूराजे मन्नूर यांचे मार्गदर्शन लाभले. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट कौशल्य, वेगवान खेळ आणि क्रीडास्पर्धेची खरी भावना(Amdar Cup 2026) जपली.

 

ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाच्या सहकार्याने पार पडलेल्या या स्पर्धेमुळे परिसरातील युवकांमध्ये क्रीडाभावना, संघभावना आणि स्पर्धात्मकतेची नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. आमदार उमा खापरे आणि जयदीप खापरे यांच्या क्रीडादृष्टिकोनातून भविष्यात अनेक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडतील, असा विश्वास क्रीडाप्रेमी आणि पालकांनी व्यक्त केला आहे. “आमदार चषक २०२६” ही केवळ स्पर्धा नसून युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारलेले प्रेरणादायी व्यासपीठ ठरले (Amdar Cup 2026) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00