Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Parking Policy:पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभावी पार्किंग पॉलिसीवर भर; महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

PCMC Parking Policy:पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभावी पार्किंग पॉलिसीवर भर; महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार्किंग पॉलिसीच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत पार्किंग पॉलिसीच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विद्यमान पार्किंग व्यवस्थेचा आढावा घेत भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अधिक सक्षम, व्यवहार्य आणि नागरिकांना दिलासा देणारी पार्किंग व्यवस्था उभारण्याबाबत चर्चा करण्यात (PCMC Parking Policy)आली.

बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर तसेच संबंधित अधिकारी आणि सल्लागार उपस्थित (PCMC Parking Policy)होते.

बैठकीत पूर्वीच्या पार्किंग पॉलिसीच्या अंमलबजावणीतील अडचणी व त्रुटींचा आढावा घेण्यात आला. शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि वाहतुकीवरील वाढता ताण लक्षात घेऊन पार्किंग व्यवस्थेचे पुनर्नियोजन करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. अनधिकृत पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करणे, व्यापारी भाग, सार्वजनिक ठिकाणे आणि प्रमुख चौकांमध्ये नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था उभारणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अंमलबजावणी प्रभावी करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी विविध विभागांनी पार्किंग व्यवस्थेची सद्यस्थिती, उपलब्ध जागा, भविष्यातील गरजा आणि नियोजनाबाबत सादरीकरण करून आवश्यक सूचना व प्रस्ताव (PCMC Parking Policy)मांडले.

महापौर रवि लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि कार्यक्षम करण्यासाठी प्रभावी पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर पार्किंग सुविधा उपलब्ध करून देतानाच वाहतूक कोंडी कमी करणे आणि शहराच्या नियोजनबद्ध विकासाला गती देणे हे महापालिकेचे उद्दिष्ट असून, त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम (PCMC Parking Policy) करावे.”

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00