Home गुन्हे Pcmc Crime News :पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : मारहाण, अपघात, चोरी, हुक्का व अमली पदार्थांच्या कारवाया

Pcmc Crime News :पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : मारहाण, अपघात, चोरी, हुक्का व अमली पदार्थांच्या कारवाया

पिंपरी-चिंचवडमध्ये मारहाण, अपघात, चोरी, हुक्का आणि अमली पदार्थांच्या प्रकरणांत पोलिसांची कारवाई. निगडी, चिंचवड, वाकड, काळेवाडी, दिघी, हिंजवडीसह शहरातील प्रमुख गुन्हेगारी घडामोडी.

by Admin
Spread the love

दारूसाठी पैसे न दिल्याने टपरीचालकाला बेदम मारहाण; चौघे ताब्यात

पिंपरी-चिंचवड : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून टपरीचालकाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच फावडे, दगड आणि लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना चिंचवडमधील अजंठानगर परिसरात घडली. या प्रकरणी निगडी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून, तीन अनोळखी साथीदारांविरोधातही गुन्हा दाखल केला (Pcmc Crime News ) आहे.

गणेश बापू इंगळे (वय २७) यांच्या फिर्यादीवरून लखन सुतार, प्रकाश पोळ, नितीन साबळे आणि सचिन भागवत यांच्यासह तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ ऑगस्ट रोजी थरमॅक्स चौकातील ग्लोबल वाईन्स तसेच अजंठानगर परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी २१ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात (Pcmc Crime News ) आला.

—————————————————-

सुरक्षा साधने न दिल्याने शेडवरून पडून तरुणाचा मृत्यू

कासारवाडी येथील ह प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात शेडवरील विद्युत रोषणाई काढताना उंचीवरून पडून राहुल साबळे या तरुणाचा मृत्यू झाला. कामाच्या ठिकाणी सुरक्षा पट्टा, हेल्मेट, सुरक्षित पादत्राणे आणि शिडी यांसारखी आवश्यक साधने उपलब्ध करून न दिल्याचा आरोप(Pcmc Crime News ) आहे.

विठ्ठल साबळे यांच्या फिर्यादीवरून राम इंगळे आणि अब्दुल गुलाब बेग यांच्याविरोधात दापोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोघांना नोटीस देण्यात आली आहे. १८ ऑगस्ट रोजी हा अपघात झाला. उपचारादरम्यान राहुलचा मृत्यू(Pcmc Crime News ) झाला.

______________________________________________________

पार्किंगच्या वादातून सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात वीट

वाकड येथील सिटी अॅव्हेन्यु कमर्शियल बिल्डिंगमध्ये पार्किंगच्या कारणावरून झालेल्या वादातून एका सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. त्यानंतर अर्धवट तुटलेली वीट डोक्यात मारल्याने सुरक्षा रक्षक पंजाब वानखेडे जखमी झाले. त्यांच्या डोक्याला पाच टाके पडले (Pcmc Crime News ) आहेत.

वानखेडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद (Pcmc Crime News ) आहे.

_______________________________________________________

सुनेला माहेरी नेण्यावरून वाद; सासूला मारहाण, चाकूने जखमी

सुनेला माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सासूला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकूने जखमी केल्याची घटना काळेवाडीतील नढेनगर परिसरात (Pcmc Crime News ) घडली.

५५ वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून काळेवाडी पोलिसांनी तिची २६ वर्षीय सून आणि कविता देवकर (वय ५५) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. २० मे रोजी हा प्रकार घडला असून, २१ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात(Pcmc Crime News ) आला.

______________________________________________________

कारची दुचाकीला पाठीमागून धडक; तरुण जखमी

काळेवाडीतील पिंपरी-काळेवाडी रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. भीमाशंकर कलशेट्टी यांच्या फिर्यादीवरून सोजल धनुरे यांच्याविरोधात काळेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला (Pcmc Crime News ) आहे.

२० ऑगस्ट रोजी सकाळी आर.जी. एंटरप्रायझेससमोर हा अपघात झाला. कारचालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा आरोप आहे. आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात (Pcmc Crime News ) आले.

______________________________________________________

ट्रेलरच्या धडकेत आई गंभीर जखमी; चालक पसार

मोशी-आळंदी रस्त्यावर भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने आई गंभीर जखमी झाली, तर मुलाच्या पायाला दुखापत झाली. अपघातानंतर ट्रेलरचालक वाहनासह पसार (Pcmc Crime News ) झाला.

प्रकाश चांदोरे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अज्ञात ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. १९ ऑगस्ट रोजी मोशी रुग्णालयासमोरील परिसरात हा अपघात झाला. नंदा चांदोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत(Pcmc Crime News ) झाली.

एसटी बसची खासगी बसला धडक; चौघे प्रवासी किरकोळ जखमी

चाकण-तळेगाव चौक परिसरात ब्रेक न लागल्याने एसटी बसने उभ्या खासगी बसला पाठीमागून धडक दिली. या अपघातात एसटीतील चार प्रवाशांना किरकोळ दुखापत(Pcmc Crime News ) झाली.

शांतीलाल मोरे यांच्या फिर्यादीवरून एसटी बसचालक सोपान कानवडे यांच्याविरोधात चाकण उत्तर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २१ ऑगस्ट रोजी सकाळी पुणे-नाशिक मार्गावर हा अपघात (Pcmc Crime News ) झाला.

दरवाजा उघडा असल्याची संधी साधून घरातून चोरी

चिंचवड येथील एका ७७ वर्षीय महिलेच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. कपाटातील रोकड व चांदीचे दागिने असा सुमारे ९ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरीला(Pcmc Crime News ) गेला.

१६ ते २१ ऑगस्टदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून निगडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला (Pcmc Crime News ) आहे.

दिघीतील हॉटेलमध्ये नियमांचे उल्लंघन करून हुक्का दिल्याचा आरोप

दिघीतील हॉटेलमध्ये स्वतंत्र धूम्रपान कक्ष नसतानाही ग्राहकांना हर्बल व तंबाखूयुक्त हुक्का पुरविल्याप्रकरणी चार जणांविरोधात दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला (Pcmc Crime News ) आहे.

हॉटेल ट्री टाऊन येथे २० ऑगस्ट रोजी रात्री कारवाई करण्यात आली. हुक्क्यासाठी पेटता कोळसा वापरताना आवश्यक सुरक्षा खबरदारी घेतली नसल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी २१ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू(Pcmc Crime News ) आहे.

सुसमध्ये १५ लाखांच्या हायड्रोपोनिक गांजासह तरुणाला अटक

सुस-नांदे रस्त्यावर विक्रीसाठी बाळगलेला १५२ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करून बावधन पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाला अटक केली. जप्त गांजाची किंमत सुमारे १५ लाख २० हजार रुपये(Pcmc Crime News ) आहे.

सचिनकुमार दयानंद प्रसाद याला अटक करण्यात आली असून, कुणाल रंजन याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ ऑगस्ट रोजी पहाटे ही कारवाई करण्यात (Pcmc Crime News ) आली.

हिंजवडीत १.१०३ किलो गांजासह तरुणाला अटक

विक्रीसाठी गांजा बाळगल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी २४ वर्षीय गणेश पवार याला अटक केली. त्याच्याकडून १.१०३ किलो गांजा आणि मोबाइल असा ६५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात (Pcmc Crime News ) आला.

२१ ऑगस्ट रोजी रात्री महाळुंगेकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला (Pcmc Crime News ) आहे.

पिंपळे गुरवमध्ये चरससह तरुणाला अटक; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपळे गुरव येथील शिवगणेश चौक परिसरात १७८ ग्रॅम ३७० मिलीग्रॅम चरससह २५ वर्षीय तरुणाला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन मोबाइल आणि दुचाकीसह एकूण २ लाख ४ हजार ५९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात(Pcmc Crime News ) आला.

प्रथमेश ऊर्फ सनी खैरे याला अटक करण्यात आली आहे. २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. चरस विक्रीसाठी आणल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू (Pcmc Crime News ) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00