Home माझं पिंपरी चिंचवड PMRDA Lottery 2026:PMRDA गृहयोजना सोडत 2026: 1029 घरांचे वाटप, अनेकांचे स्वप्न साकार

PMRDA Lottery 2026:PMRDA गृहयोजना सोडत 2026: 1029 घरांचे वाटप, अनेकांचे स्वप्न साकार

PMRDA च्या पेठ 12 आणि 30-32 गृहयोजनेची संगणकीय सोडत पार. 1029 सदनिकांचे वाटप; लाभार्थ्यांना घर मिळण्याचा आनंद, प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) पेठ क्रमांक १२ आणि ३०-३२ अंतर्गत राबविण्यात आलेल्या गृहयोजनेची संगणकीय सोडत बुधवारी (दि. ८) आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडली. या सोडतीत एकूण १०२९ सदनिकांचे वाटप करण्यात आले असून, अनेक कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार (PMRDA Lottery 2026) झाले.

 

सोडती दरम्यान लाभार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. नाव जाहीर होताच उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. लाभार्थ्यांना कर्जप्रकरणे व इतर प्रक्रियांसाठी पीएमआरडीएकडून आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य दिले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट (PMRDA Lottery 2026)केले.

 

ही संपूर्ण प्रक्रिया ओव्हरसाईट समितीच्या देखरेखीखाली पार पडली. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी दीपक नलावडे, धनंजय कुलकर्णी आणि नीलकंठ पोमण उपस्थित होते, तर म्हाडाच्या सविता बोडके यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देखरेख(PMRDA Lottery 2026) ठेवली.

 

कार्यक्रमात सहआयुक्त पूनम मेहता यांनी सोडतीची माहिती दिली. सूत्रसंचालन पूनम बोराटे यांनी केले, तर उपआयुक्त हिम्मत खराडे यांनी आभार(PMRDA Lottery 2026) मानले.

 

सोडतीत निवड झालेल्या लाभार्थ्यांचे महानगर आयुक्तांनी अभिनंदन केले असून, परवडणाऱ्या गृहनिर्माणाच्या दिशेने ही योजना महत्त्वाची पायरी ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात(PMRDA Lottery 2026) आले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00