प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महापालिकेत ५२ कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, लेखा विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन हे या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा दावा (PCMC 52 Crore Scam)केला.
बारणे यांच्या माहितीनुसार, प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करत ५२ कोटींहून अधिक रकमेची बिले ठेकेदारांना थेट अदा करण्यात आली. विशेष म्हणजे, सन २०२६-२७ च्या मंजूर अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद नसतानाही सुमारे ७० पेक्षा अधिक कामांची बिले रात्रीतून काढण्यात आल्याचे समोर आले आहे. या कामांमध्ये प्रामुख्याने स्थापत्य व पाणीपुरवठा विभागाचा समावेश असून संबंधित विभागप्रमुखांनाही याची माहिती नसल्याचे सांगितले जात (PCMC 52 Crore Scam)आहे.
या व्यवहारासाठी बोगस उपसूचनांचा वापर केल्याचा संशय व्यक्त होत असून, सुमारे २० नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांद्वारे कामांना मंजुरी मिळवण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित नगरसेवकांनी मात्र आपण आपल्या प्रभागातील कामांसाठीच स्वाक्षऱ्या केल्याचे स्पष्ट केले(PCMC 52 Crore Scam) आहे.
या प्रकरणाला ‘थेट दरोडा’ असे संबोधत अभिषेक बारणे यांनी प्रवीण जैन यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांचे तात्काळ निलंबन करण्याचीही मागणी करण्यात आली असून, याबाबत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले(PCMC 52 Crore Scam) आहे.
