प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी (HSC) परीक्षेचा निकाल आज, २ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार असून दुपारी १ वाजता अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहण्यासाठी लिंक उपलब्ध होणार (HSC Result 2026) आहे.
निकाल जाहीर होण्यापूर्वी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत एकूण निकालाची आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आपले गुण तपासू (HSC Result 2026)शकतील.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्स:
👉 https://hscresult.mkcl.org
👉 https://mahahsscboard.in
👉 https://mahresult.nic.in
निकाल कसा पाहाल?
विद्यार्थ्यांनी संबंधित वेबसाइटवर जाऊन ‘HSC Examination Result 2026’ या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर आपला आसन क्रमांक (Roll Number) आणि आईचे नाव भरून ‘Submit’ केल्यावर निकाल स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील वापरासाठी प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट जतन(HSC Result 2026) करावा.
डिजीलॉकरवरही मार्कशीट उपलब्ध
यंदा विद्यार्थ्यांना DigiLocker वर डिजिटल मार्कशीट उपलब्ध करून दिली जाणार आहे. आधार कार्ड व नोंदणीकृत मोबाईल नंबरच्या मदतीने लॉगिन करून मार्कशीट डाउनलोड करता(HSC Result 2026) येईल.
महत्त्वाची सूचना:
निकाल पाहताना केवळ अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करावा. अफवा किंवा अनधिकृत लिंकपासून दूर (HSC Result 2026)राहावे.
