प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा एकूण उत्तीर्णता ८९.७९ टक्के नोंदवली गेली आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम तसेच आयटीआय शाखांसाठी एकूण १४,४४,७१३ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,३३,०५८ विद्यार्थी परीक्षेस बसले आणि १२,८६,८४३ विद्यार्थी उत्तीर्ण (Maharashtra HSC Result 2026) झाले.
खाजगी विद्यार्थ्यांमध्ये ३७,५५९ जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३६,९४१ विद्यार्थी परीक्षेस बसले आणि २९,६३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची उत्तीर्णता टक्केवारी ८०.२१(Maharashtra HSC Result 2026) आहे.
पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या ५०,८७६ होती. त्यापैकी ५०,३४६ विद्यार्थी परीक्षेस बसले आणि १८,३४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या गटाची उत्तीर्णता ३६.४४ टक्के नोंदवली गेली (Maharashtra HSC Result 2026) आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी ८,४४६ जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८,३६७ विद्यार्थी परीक्षेस बसले आणि ७,५७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची उत्तीर्णता ९०.५८ टक्के आहे. पात्र विद्यार्थ्यांना नियमानुसार सवलतीचे गुण देण्यात (Maharashtra HSC Result 2026)आले.
विभागनिहाय निकालात कोकण विभाग ९४.१४ टक्के निकालासह अव्वल ठरला, तर लातूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के असून तो सर्वांत कमी (Maharashtra HSC Result 2026)आहे.
यंदाही मुलींनी निकालात आघाडी घेतली आहे. मुलींची उत्तीर्णता ९३.१५ टक्के असून मुलांची ८६.८० टक्के आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा ६.३५ टक्क्यांनी अधिक (Maharashtra HSC Result 2026)आहे.
विशेष म्हणजे, एकूण १५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला असून ही बाब विशेष लक्षवेधी ठरली (Maharashtra HSC Result 2026)आहे.
