Home महाराष्ट्र PCMC commissioner:पालिका सर्वसाधारण सभेत प्रशासनावर सवाल; श्वेतपत्रिकेची मागणी जोरात

PCMC commissioner:पालिका सर्वसाधारण सभेत प्रशासनावर सवाल; श्वेतपत्रिकेची मागणी जोरात

Pimpri-Chinchwad Municipal Corporation च्या सर्वसाधारण सभेत प्रशासकीय कार्यकाळातील कामांची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी. सत्ताधारी व विरोधकांकडून प्रशासनावर टीका; शेखर सिंग यांच्या कार्यकाळातील निर्णयांवर प्रश्न.

by Admin
Spread the love

सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही प्रशासनावर सवाल

पिंपरी-चिंचवड (PCMC) मनपाच्या सर्वसाधारण सभेत प्रशासकीय कार्यकाळातील कामांची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे या मुद्द्यावर विरोधकांसोबतच काही सत्ताधारी नगरसेवकांनीही प्रशासनावर टीका (PCMC commissioner) केली.

सभेत बोलताना शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी मागील चार वर्षांत झालेल्या कामांचा सविस्तर अहवाल सभागृहासमोर सादर करण्याची मागणी केली. कोणती कामे पूर्ण झाली, किती निधी खर्च झाला, कोणत्या प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आणि त्याचा नागरिकांना नेमका काय फायदा झाला, याबाबत पारदर्शक माहिती द्यावी, असे त्यांनी स्पष्ट (PCMC commissioner)केले.

तत्कालीन आयुक्त शेखर सिंग यांच्या कार्यकाळातील मोठ्या आर्थिक निर्णयांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. संबंधित खर्चांची चौकशी करून अहवाल सभागृहात सादर करावा, अशी मागणी सदस्यांनी (PCMC commissioner)केली.

सभेदरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. निधीअभावी कामे रखडल्याचे सांगितले जात असताना, प्रशासकीय काळात निधी नेमका कुठून उपलब्ध झाला, असा सवालही उपस्थित झाला. काही सदस्यांनी श्वेतपत्रिका काढण्यास समर्थन दर्शविले; मात्र सविस्तर चर्चा न होता विषय तहकूब करण्यात आल्याचे (PCMC commissioner)समजते.

या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, प्रशासनाच्या कामकाजावर पुढील काळात अधिक बारकाईने लक्ष ठेवले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांच्या पैशांचा पारदर्शक हिशोब मांडला जावा, अशी सर्वसाधारण अपेक्षा (PCMC commissioner)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00