Home महाराष्ट्र SSC Result 2026:महाराष्ट्र SSC निकाल 2026 जाहीर; राज्याचा निकाल 92.09%, मुलीच पुन्हा अव्वल

SSC Result 2026:महाराष्ट्र SSC निकाल 2026 जाहीर; राज्याचा निकाल 92.09%, मुलीच पुन्हा अव्वल

महाराष्ट्र राज्य मंडळाचा दहावी (SSC) निकाल 2026 जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल 92.09% लागला आहे. मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. कोकण विभाग राज्यात अव्वल ठरला.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून, मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा सरस कामगिरी केली (SSC Result 2026) आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत मोठी उत्सुकता होती. यंदा मुलींचा निकाल ९४.९६ टक्के लागला असून मुलांचा निकाल ८९.५६ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे मुलींचा निकाल मुलांपेक्षा ५.४० टक्क्यांनी अधिक (SSC Result 2026) आहे.

विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने ९७.६२ टक्के निकालासह राज्यात प्रथम क्रमांक कायम राखला आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर विभागाचा ९५.४७ टक्के आणि पुणे विभागाचा ९४.२४ टक्के निकाल लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल ९४.१७ टक्के, नाशिक विभागाचा ९०.५३ टक्के, अमरावती विभागाचा ९०.५० टक्के, नागपूर विभागाचा ८९.०७ टक्के, लातूर विभागाचा ८८.४२ टक्के तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा ८८.४१ टक्के निकाल नोंदविण्यात आला (SSC Result 2026) आहे.

यंदा नियमित विद्यार्थ्यांपैकी १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांचा निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. खाजगी विद्यार्थ्यांचा निकाल ७६.३३ टक्के लागला असून २८ हजार ८२५ विद्यार्थ्यांपैकी २२ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ३३.७९ टक्के लागला असून २८ हजार ८६७ विद्यार्थ्यांपैकी १७ हजार ७५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले (SSC Result 2026) आहेत.

विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज, ८ मे २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून वैयक्तिक निकाल पाहता येणार (SSC Result 2026) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00