Home प्रेरणा / यशकथा Dr Kashinath Devdhar:संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर; शस्त्रास्त्र निर्यातीमध्येही मोठी झेप – डॉ. काशिनाथ देवधर

Dr Kashinath Devdhar:संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर; शस्त्रास्त्र निर्यातीमध्येही मोठी झेप – डॉ. काशिनाथ देवधर

निगडीतील मधुश्री व्याख्यानमालेत बोलताना डॉ. काशिनाथ देवधर यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवर भाष्य केले. स्वदेशी क्षेपणास्त्रे, संरक्षण तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्र निर्यातीत भारताने मोठी झेप घेतल्याचे त्यांनी सांगितले.

by Admin
Spread the love

पिंपरी (दि. ८ मे २०२६) : “एकेकाळी संरक्षण क्षेत्रात शस्त्रास्त्र आयात करणारा भारत आज आत्मनिर्भर बनला असून, आता जगभरात शस्त्रास्त्रांची निर्यात करणारा देश म्हणूनही उदयास येत आहे,” असे प्रतिपादन सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ. काशिनाथ देवधर यांनी (Dr Kashinath Devdhar) केले.

 

निगडी प्राधिकरण येथील स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृहात गुरुवारी (दि. ७ मे) आयोजित ‘मधुश्री व्याख्यानमाला’ मालिकेतील ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावरील द्वितीय पुष्पात ते बोलत होते. मधुश्री कला आविष्कार आणि स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक अतुल इनामदार (Dr Kashinath Devdhar) होते.

 

यावेळी नगरसेवक कैलास कुटे, मधुश्री कला आविष्कारच्या अध्यक्षा माधुरी ओक, कार्याध्यक्ष सलीम शिकलगार, सचिव राजेंद्र बाबर, कोषाध्यक्ष अजित देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार तसेच शास्त्रज्ञ डॉ. अशोक नगरकर उपस्थित (Dr Kashinath Devdhar) होते.

 

प्रास्ताविकात सलीम शिकलगार यांनी “सांस्कृतिक भूक भागविण्यासह ज्ञानार्जन व्हावे या उद्देशाने १६ वर्षांपूर्वी मधुश्री व्याख्यानमालेची सुरुवात करण्यात आली,” अशी माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतात अतुल इनामदार यांनी “पंतप्रधानांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आत्मनिर्भर भारत अभियानामुळे संरक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत,” असे  (Dr Kashinath Devdhar)सांगितले.

 

डॉ. देवधर म्हणाले, “भारताने अवकाश संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा ठाम निर्णय घेतल्यानंतर मोठी प्रगती साधली आहे. पृथ्वी, आकाश, त्रिशूल, नाग आणि अग्नी यांसारख्या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीद्वारे भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण केला आहे. भूदल, नौदल आणि हवाईदल या तिन्ही दलांसाठी स्वदेशी शस्त्रास्त्रांची निर्मिती आणि निर्यात वाढत असून विशेषतः २०१४ नंतर या क्षेत्रात भारताने उल्लेखनीय यश मिळवले (Dr Kashinath Devdhar)आहे.”

 

युद्धनीती, स्वदेशी तंत्रज्ञान आणि संरक्षण सामर्थ्य यांचा उल्लेख करताना त्यांनी भारताच्या वाढत्या संरक्षण क्षमतेचे विविध उदाहरणांसह विश्लेषण केले. चित्रफितीच्या माध्यमातून त्यांनी विषयाची सविस्तर मांडणी (Dr Kashinath Devdhar)केली .

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अश्विनी कुलकर्णी, राज अहेरराव, प्रा. पी. बी. शिंदे, चिंतामणी कुलकर्णी, चंद्रकांत शेडगे आणि मिलिंद कुलकर्णी यांनी सहकार्य केले. उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन केले, तर मनीषा मुळे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप  (Dr Kashinath Devdhar) झाला.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00