पिंपरी-चिंचवड : पिंपळे निलख येथील रक्षक चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, हा पूल सुरू झाल्यानंतर औंध ते सांगवी फाटा आणि रावेतमार्गे किवळेपर्यंतचा प्रवास सिग्नलमुक्त व वाहतूककोंडीमुक्त होणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी (Rakshak Chowk Flyover) दिली .
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच या प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. यावेळी पिंपळे गुरव येथील जनसंपर्क कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करून कामाचा सविस्तर आढावा घेण्यात (Rakshak Chowk Flyover)आला.
पाहणीवेळी नगरसेविका आरती चोंधे, नगरसेविका स्नेहा कलाटे, महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सामाजिक कार्यकर्ते संकेत चोंधे, प्रसाद कस्पटे, सनी बारणे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित (Rakshak Chowk Flyover)होते.
रक्षक चौक हा शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा बिंदू मानला जातो. त्यामुळे पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार शंकर जगताप यांनी प्रशासनाला दिल्या. यासोबतच बीआरटी बस वाहतुकीचे नियोजन, प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतुकीचा सुरळीत प्रवाह यावर विशेष भर देण्यात (Rakshak Chowk Flyover)आला.
पुलाच्या रेलिंगसह संपूर्ण प्रकल्पाचे तातडीने ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या उड्डाणपुलामुळे नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान होणार असून वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. सांगवी ते किवळे या बीआरटी मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मोठी मदत होणार (Rakshak Chowk Flyover)आहे.
“रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहराच्या शाश्वत विकासासाठी आणि सुलभ वाहतुकीसाठी महापालिका कटिबद्ध आहे,” असे अभिषेक बारणे यांनी (Rakshak Chowk Flyover)सांगितले.
तसेच, “आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. हा पूल लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन असून, प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी सेफ्टी ऑडिटबाबत कडक सूचना देण्यात आल्या आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट(Rakshak Chowk Flyover) केले.
