Home पर्यटन Shared Feeder Auto:पीसीएमसी मेट्रो स्थानकावर शेअर्ड फीडर ऑटो सेवा सुरू; प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुलभ

Shared Feeder Auto:पीसीएमसी मेट्रो स्थानकावर शेअर्ड फीडर ऑटो सेवा सुरू; प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुलभ

पुणे मेट्रो आणि रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने पीसीएमसी मेट्रो स्थानकावर शेअर्ड फीडर ऑटो सेवा सुरू करण्यात आली. पिंपळे सौदागर, काळेवाडी, चाफेकर चौक आणि चिखली मार्गांवर प्रवाशांना सुविधा उपलब्ध.

by Admin
Spread the love

पिंपरी : पुणे मेट्रोने प्रवाशांच्या ‘फर्स्ट-टू-लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ला चालना देण्यासाठी पीसीएमसी मेट्रो स्थानकावर ‘शेअर्ड फीडर ऑटो सेवा’ सुरू केली आहे. महामेट्रो आणि रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या सेवेचा शुभारंभ करण्यात (Shared Feeder Auto) आला.

या सुविधेमुळे नागरिकांना घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत आणि स्थानकापासून इच्छित स्थळी सहज, सुरक्षित व किफायतशीर प्रवास करता येणार आहे. त्यामुळे मेट्रो प्रवाशांचा वेळ, खर्च आणि प्रवासातील गैरसोय कमी होण्यास मदत होणार (Shared Feeder Auto)आहे .

 

प्राथमिक टप्प्यात ही सेवा पीसीएमसी मेट्रो स्थानकावरून पिंपळे सौदागर, काळेवाडी फाटा, चाफेकर चौक (चिंचवड) आणि चिखली (टाळगाव कमान) या चार प्रमुख मार्गांवर उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन भविष्यात या सेवेचा विस्तार अन्य मार्गांवरही केला जाणार (Shared Feeder Auto) आहे.

 

उद्घाटनप्रसंगी महामेट्रोचे महाव्यवस्थापक कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर-पाटील, रिक्षा पंचायतचे पदाधिकारी तसेच पुणे मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मेट्रो स्थानके आणि निवासी भाग यांमधील अंतर कमी करून सार्वजनिक वाहतूक अधिक प्रभावी बनविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात (Shared Feeder Auto) आला.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00