Home आरोग्य Water Tank:वाकड परिसरात २५ लाख लिटर क्षमतेच्या उंच पाण्याच्या टाकीचे लोकार्पण

Water Tank:वाकड परिसरात २५ लाख लिटर क्षमतेच्या उंच पाण्याच्या टाकीचे लोकार्पण

by Admin
Spread the love

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे वाकड येथील कावेरीनगर परिसरात उभारण्यात आलेल्या २५ लाख लिटर क्षमतेच्या उंच पाण्याच्या टाकीचे तथा संपवेलचे लोकार्पण आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या टाकीतून आजपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, वाकड परिसरातील कस्पटे वस्ती, पिंक सिटी रोड, वेणूनगर, कावेरीनगर, पोलीस कॉलनी, दत्त मंदिर रोड आदी भागातील जलपुरवठा आता अधिक सुरळीत होणार असल्याचे (Water Tank )आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले.

वॉर्ड क्र. ५३, सर्वे नं. २०८ येथे महापालिकेने ५ कोटी ८५ लाख रुपये खर्चून अत्याधुनिक सुविधांसह ही उंच टाकी उभारली आहे. शहराची वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि वाढते पाणीउपसा मागणी लक्षात घेऊन पाणीपुरवठा व्यवस्थेचे सबलीकरण करण्यासाठी महापालिकेतर्फे सातत्याने कामे हाती घेतली जात असल्याचे आमदार जगताप (Water Tank ) यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, माजी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, संदीप कस्पटे, आरती चौधें यांच्यासह मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, अनिल भालसाखळे, क्षेत्रीय अधिकारी आश्विनी भोसले, कार्यकारी अभियंता महेश बरिदे, महेश कावळे, विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि (Water Tank ) मान्यवर उपस्थित होते.

पाणीपुरवठा विभागाकडून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे परिसरातील पाणीअभावाची समस्या सोडविण्यास मोठी मदत होणार आहे. “शहरातील नागरिकांना उत्तम रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. शहराचा वेगाने होत असलेला विकास आणि ३५ लाखांच्या आसपास पोहोचलेली लोकसंख्या लक्षात घेता आगामी काळात पाणीपुरवठ्याच्या आणखी सक्षम योजना राबविण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक सहकार्य मिळवून देऊ,” असेही आमदार जगताप  (Water Tank )यांनी सांगितले.

प्रास्ताविक प्रविण धुमाळ यांनी तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. आभार मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी (Water Tank ) मानले.


नवीन पंप हाऊसची उभारणी

कावेरीनगर येथे उभारलेल्या नव्या टाकीत नियमितपणे पाणी भरून अखंडित जलपुरवठा सुरू ठेवण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागातर्फे आधुनिक पंप हाऊसची उभारणी करण्यात आली आहे. टाकी भरण्यासाठी ५० एचपी क्षमतेचे दोन वर्किंग पंप आणि एक स्टँडबाय पंप बसविण्यात आले असून, या यंत्रणेच्या मदतीने संपूर्ण टाकी सुमारे सहा  (Water Tank )तासांत भरली जाईल.

या पंप हाऊससाठी २०० केव्हीएचा स्वतंत्र वीजभार मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी २०० केव्हीए क्षमतेचे स्वतंत्र रोहित्र संच तसेच उच्च दाब नियंत्रणासाठी दोन आरएमयू (RMU) बसविण्यात आले आहेत, अशी माहिती सहशहर अभियंता (विद्युत) अनिल भालसाखळे (Water Tank ) यांनी दिली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00