Home गुन्हे PMPML-Crime:पुण्यात पीएमपी बसमध्ये मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न; प्रवाशांच्या मदतीने चोरटी महिला पकडली

PMPML-Crime:पुण्यात पीएमपी बसमध्ये मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न; प्रवाशांच्या मदतीने चोरटी महिला पकडली

by Admin
Spread the love

पुणे महानगरपालिका भवन ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे जाणाऱ्या पीएमपी बसमध्ये एका महिलेकडील मंगळसूत्र कटरने कापून चोरण्याचा प्रयत्न करणारी चोरटी महिला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अखेर पकडली गेली. चोरीचा प्रयत्न अपयशी ठरताच संशयित महिलेने ब्लेडने फिर्यादीवर वार करत पसार होण्याचा प्रयत्न केला, मात्र बसमधील प्रवाशांनी तिला तात्काळ पकडून (PMPML-Crime)पोलिसांच्या ताब्यात दिले.

अटक केलेल्या महिलेचे नाव अश्विनी अविनाश भोसले (वय २९, रा. गंगेवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरातील ५३ वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (PMPML-Crime) केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रविवार, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता महापालिका भवन येथून स्वारगेटकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवास करत होत्या. बस शिवाजी रोडवरील वसंत चित्रपटगृहाजवळ पोहोचताच त्यांच्या जवळ उभ्या असलेल्या अश्विनी भोसले हिने कटरचा वापर करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडण्याचा (PMPML-Crime) प्रयत्न केला.

फिर्यादींना ही बाब तात्काळ लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर संशयित भोसले हिने आपल्या जवळील ब्लेडने फिर्यादींच्या हातावर वार करून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र बसमधील प्रवाशांनी तिचा पळून जाण्याचा प्रयत्न हाणून पाडत तिला घटनास्थळीच पकडून ठेवले आणि पोलिसांच्या (PMPML-Crime) हवाली केले.

या आरोपी महिला यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. तिच्याकडून पीएमपी बसमधील प्रवाशांचे दागिने चोरण्याचे इतर गुन्हे आहेत का, याबाबत पोलीस तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे यांनी (PMPML-Crime) दिली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00