Home गुन्हे Cousin Murder Pune:चुलत भावाचा खून; मृतदेह डोंगरात फेकला

Cousin Murder Pune:चुलत भावाचा खून; मृतदेह डोंगरात फेकला

by Admin
Spread the love

पुणे  प्रतिनिधी– अनैतिक संबंधांच्या संशयातून चुलत भावाचा चाकूने खून करून मृतदेह डोंगरात फेकून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी एका आरोपीला अटक (Cousin Murder Pune) केली आहे.

अटक झालेल्या आरोपीचे नाव अशोक पंडित (वय 35, रा. मोशी, मूळ रा. झारखंड) आहे. खून झालेल्या युवकाचे नाव अजय पंडित (वय 23, रा. खोपडेनगर, कात्रज, मूळ रा. झारखंड) आहे. दोघेही चुलत भाऊ असून पुण्यात मजुरी (Cousin Murder Pune) करत होते.

अजय अचानक बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही चित्रीकरण यांच्या आधारे शोध सुरू केला. तपासाची दिशा आरोपी अशोककडे वळली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर चौकशीत त्याने(Cousin Murder Pune) गुन्ह्याची कबुली दिली.

अनैतिक संबंधांच्या संशयातून वाद झाला आणि त्यातून अशोकने चाकूने अजयचा खून केला. खून केल्यानंतर अजयचा मृतदेह कात्रज घाटातील गुजरवाडी परिसरात फेकून दिल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी मृतदेह शोधून ससून  (Cousin Murder Pune) रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

ही कारवाई परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांच्या (Cousin Murder Pune) पथकाने केली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00