पिंपरी-चिंचवड – शहराच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अधिकृत पत्राद्वारे विजय उर्फ शीतल गोरख शिंदे यांच्या नावाची उपमहापौरपदी घोषणा करूनही, शीतल शिंदे यांनी हे पद स्वीकारण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.
“मला कोणतेही पद नको. मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करेन,” अशी ठाम भूमिका घेत शीतल शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवनातून नाराजी व्यक्त करत बाहेर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महापौर पदासाठीची नाराजी ठरली कारण
शीतल शिंदे हे महापौर पदासाठी इच्छुक होते. मात्र, भाजपने रवी लांडगे यांच्या नावावर महापौरपदासाठी शिक्कामोर्तब केल्याने आणि शिंदे यांना उपमहापौर पद देण्यात आल्याने ते नाराज झाले असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या पत्रानंतरही नकार
प्रदेशाध्यक्षांचे अधिकृत पत्र जिल्हाध्यक्षांकडे पोहोचल्यानंतरही शीतल शिंदे यांनी उपमहापौर पद स्वीकारण्यास नकार देत, “सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करायचे आहे,” अशी भूमिका स्पष्ट केली आहे.
पीसीएमसी भवनात खळबळ
या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) परिसरात मोठी खळबळ उडाली असून, भाजपच्या स्थानिक नेतृत्वासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
भाजपची पुढील दिशा काय?
