Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Mayor:नगरसेवक रवी लांडगे यांची बिनविरोध महापौरपदी, तर शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी निवड

PCMC Mayor:नगरसेवक रवी लांडगे यांची बिनविरोध महापौरपदी, तर शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी निवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता भक्कम. भोसरी प्रभागातील नगरसेवक रवी लांडगे यांची महापौरपदी तर शर्मिला बाबर उपमहापौरपदी बिनविरोध निवड निश्चित.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड (दि. ०२ फेब्रुवारी २०२६) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत कोणताही विरोध न झाल्याने सत्तास्थापनेचा मार्ग पूर्णतः मोकळा झाला आहे. भोसरी प्रभाग क्रमांक ६ मधून बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवी लांडगे यांची महापालिकेच्या महापौरपदी बिनविरोध निवड निश्चित झाली (PCMC Mayor)आहे.

त्याचप्रमाणे, प्रभाग क्रमांक 15 मधील भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेवक शर्मिला बाबर यांचीही उपमहापौरपदी बिनविरोध निवड निश्चित ठरली आहे. महापौर पदांसाठी इतर कोणताही उमेदवार रिंगणात नसल्याने ही संपूर्ण निवड प्रक्रिया औपचारिक ठरणार(PCMC Mayor) असली तरी उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी तर्फे वैशाली काळभोर यांनी आता तरी फॉर्म भरला आहे,त्यामुळे उपमहापौर पदासाठी निवडणूक होईल की ते ही बिनविरोध येतील हे पाहणे मनोरंजक ठरेल.

या पंचवार्षिक कार्यकाळात प्रथमच भोसरी विधानसभा मतदारसंघाला महापौरपदाचा मान मिळाल्याने परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांकडून रवी लांडगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत (PCMC Mayor)आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली ही निवड निश्चित करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. या निवडीमुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता अधिक भक्कम होत असल्याचे स्पष्ट झाले(PCMC Mayor) आहे.

महापौर कोणताही विरोध नसल्याने भाजपच्या संघटनात्मक ताकदीचे आणि महापालिकेतील बहुमताचे हे स्पष्ट प्रतिबिंब मानले जात आहे. आगामी काळात शहराचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा, नागरिकांच्या समस्या आणि प्रशासनावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यावर भर दिला जाणार असल्याचे संकेत पक्षाच्या वतीने देण्यात आले (PCMC Mayor)आहेत.

खरं तर आधी उपमहापौर पदी प्रभाग 19 चे जेष्ठ नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे यांची नियुक्ती झाली होती पण शिंदे यांनी ते पद नाकारले, आता ती नाराजी पक्ष कसा दूर करेल हेच पाहणे जास्त महत्वपूर्ण ठरणार आहे, सध्या तरी शिंदे नाराजी नाट्या मुळे प्रचंड चर्चेत आले आहेत.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00