Home महाराष्ट्र Ravi Landge:महापौर रवी लांडगे यांचा “माझा फार्मासिस्ट, माझा अभिमान” गौरवचिन्हाने सन्मान

Ravi Landge:महापौर रवी लांडगे यांचा “माझा फार्मासिस्ट, माझा अभिमान” गौरवचिन्हाने सन्मान

पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनतर्फे रवि लांडगे यांचा “माझा फार्मासिस्ट, माझा अभिमान” या गौरवचिन्हाने सन्मान. केमिस्ट व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्याबाबत महापौरांची सकारात्मक भूमिका.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे नवनिर्वाचित महापौर रवि लांडगे यांचा पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनतर्फे “माझा फार्मासिस्ट, माझा अभिमान” या गौरवचिन्हाने सन्मान करण्यात (Ravi Landge) आला.

महानगरपालिकेच्या प्रशासकीय भवनातील महापौर कक्षात आयोजित कार्यक्रमात हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी बोलताना महापौर लांडगे यांनी केमिस्ट व्यावसायिकांच्या अडचणी सोडविणे, नियमावली सुलभ करणे आणि शहरातील आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम बनविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही (Ravi Landge)दिली.

स्वतः फार्मासिस्ट असल्यामुळे आरोग्य क्षेत्रातील जबाबदाऱ्या आणि आव्हाने जवळून अनुभवली असल्याचे सांगत, हा सन्मान माझा नसून संपूर्ण केमिस्ट समुदायाचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास पुणे जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील केमिस्ट संघटनांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने केमिस्ट बंधू-भगिनी उपस्थित होते. महापौरपदी फार्मासिस्टाची निवड झाल्याने शहरातील औषध विक्रेते व केमिस्ट समुदायात आनंदाचे वातावरण आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00