Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Industrial Meeting:औद्योगिक समस्या सोडवण्यासाठी महापालिका–लघुउद्योग संघटनेची बैठक; १५ मागण्या मांडल्या

PCMC Industrial Meeting:औद्योगिक समस्या सोडवण्यासाठी महापालिका–लघुउद्योग संघटनेची बैठक; १५ मागण्या मांडल्या

रस्ते, पाणी, करप्रश्न, सुरक्षा आणि पुनर्वसनासह विविध मुद्द्यांवर चर्चा; मनपाकडून सकारात्मक प्रतिसाद-PCMC Industrial Meeting

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योगांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत औद्योगिक परिसरातील मूलभूत सुविधा, करप्रश्न, पायाभूत सुविधा आणि सुरक्षाविषयक मुद्द्यांवर चर्चा (PCMC Industrial Meeting) झाली .

 

बैठकीस संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, पदाधिकारी तसेच महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बंगाडे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आदी अधिकारी उपस्थित(PCMC Industrial Meeting) होते.

 

संघटनेने महापालिकेकडे १५ प्रमुख मागण्या मांडल्या. त्यामध्ये कुदळवाडी–चिखली येथील उद्योजकांचे पुनर्वसन, एलबीटी नोटिसा रद्द करणे, T-201 प्रकल्पातील गाळ्यांचे दर कमी करणे, औद्योगिक रस्त्यांचे डांबरीकरण, पाणीपुरवठा सुधारणा, घनकचरा व्यवस्थापन, पथदिवे दुरुस्ती, पीएमपीएमएल बस सेवा, सार्वजनिक शौचालये आणि चोरी-गुन्हेगारीवर नियंत्रण यांचा समावेश (PCMC Industrial Meeting) होता.

 

महापालिकेने अनेक मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत औद्योगिक रस्त्यांसाठी २२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचे सांगितले. खराब रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा सुधारणा, कचरा व्यवस्थापन, पथदिवे दुरुस्ती आणि बससेवा वाढीसाठी टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाने(PCMC Industrial Meeting) दिले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00