पूर्णानगर : पूर्णानगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. समाजाप्रती उत्तरदायित्व जपत उदारहस्ते मदत करणाऱ्या उद्योजक अनिल नेवाळे, सतीश बेंडे, संजय नाना पठारे, सतीश वाणी आणि मेजर सुरेश डोके यांचा विशेष सन्मान करण्यात (Purnanagar senier Citizens) आला.
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सन्मानित मान्यवरांनी अत्याधुनिक पाणपोई, जलकुंभ, पंखे तसेच बैठक व्यवस्थेसाठी साहित्य देत अक्षय दानाचे लोकार्पण (Purnanagar senier Citizens) केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष अंकुश बापू सुद्रिक होते. माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे, कार्याध्यक्ष सुनील कदम आणि सामाजिक कार्यकर्ते पप्पूशेठ लोढा यांची प्रमुख उपस्थिती (Purnanagar senier Citizens) होती.
प्रस्तावना सुनील कदम यांनी केली. राजेंद्र घावटे व नारायण बहिरवाडे यांनी सन्मानितांचे कौतुक करत संघाच्या कार्याची प्रशंसा (Purnanagar senier Citizens) केली.
कार्यक्रमाचे संयोजन डॉ. वसंत पुंजे, पप्पू लोढा आणि शशिकांत बाभळकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. कल्याण वाणी यांनी (Purnanagar senier Citizens) केले.
