Home माझं पिंपरी चिंचवड AIOCD Bandh 2026:ऑनलाइन औषध विक्रीविरोधात पिंपरी-चिंचवड बंद; केमिस्ट आंदोलनाला १००% प्रतिसाद

AIOCD Bandh 2026:ऑनलाइन औषध विक्रीविरोधात पिंपरी-चिंचवड बंद; केमिस्ट आंदोलनाला १००% प्रतिसाद

AIOCD च्या देशव्यापी बंदला शहरातील होलसेल आणि रिटेल औषध विक्रेत्यांचा उत्स्फूर्त सहभाग; महापौर रविभाऊ लांडगे यांचा ठाम पाठिंबा

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील औषध विक्रेत्यांनी अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (AIOCD) च्या देशव्यापी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बुधवारी संपूर्ण शहरातील औषध दुकाने बंद ठेवली. होलसेल आणि रिटेल क्षेत्रातील सर्व केमिस्ट बांधवांनी या आंदोलनात सहभागी होत संघटनेची एकजूट दाखवून दिली. शहरात या बंदला तब्बल १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला (AIOCD Bandh 2026)आहे.

 

औषध व्यवसायासमोरील विविध गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला होता. विशेषतः ऑनलाइन औषध विक्री आणि ई-फार्मसी कंपन्यांच्या अनियंत्रित कारभाराविरोधात केमिस्ट संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलन पूर्णपणे शांततेत, शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गाने पार पडल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी (AIOCD Bandh 2026)सांगितले.

 

या आंदोलनाद्वारे ऑनलाइन औषध विक्रीवर तात्काळ निर्बंध आणण्याची मागणी करण्यात आली. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय नियमबाह्य पद्धतीने औषध विक्री होत असल्याने रुग्णांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याचा आरोप संघटनांनी केला. औषध वितरण प्रक्रियेत प्रशिक्षित फार्मासिस्टची भूमिका महत्त्वाची असून ऑनलाइन पद्धतीमुळे पारंपरिक औषध विक्री व्यवस्थेवर परिणाम होत असल्याची भावना केमिस्ट बांधवांनी व्यक्त (AIOCD Bandh 2026)केली.

 

तसेच ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अ‍ॅक्टची कठोर अंमलबजावणी करावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी आणि लघु व मध्यम औषध विक्रेत्यांचे संरक्षण करावे, अशा मागण्याही यावेळी करण्यात(AIOCD Bandh 2026) आल्या.

 

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर तथा फार्मासिस्ट रविभाऊ लांडगे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. ऑनलाइन औषध विक्रीमुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून स्थानिक फार्मासिस्ट आणि जनऔषध सेवेला धोका निर्माण होत असल्याची भूमिका त्यांनी मांडली. “औषध हे केवळ उत्पादन नसून तज्ज्ञ फार्मासिस्टच्या मार्गदर्शनाखाली दिली जाणारी आरोग्य सेवा आहे,” असे मत त्यांनी व्यक्त(AIOCD Bandh 2026) केले.

 

या बंदला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल काळेवाडी-रहाटणी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे उपाध्यक्ष विवेक मल्हारी तापकीर यांनी सर्व होलसेलर, रिटेलर आणि औषध विक्रेत्यांचे आभार (AIOCD Bandh 2026)मानले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00