Home माझं पिंपरी चिंचवड Pcmc Property Tax:पीसीएमसीच्या ४% ऑनलाईन मालमत्ता कर सवलत योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; १३,१४१ नागरिकांचा लाभ

Pcmc Property Tax:पीसीएमसीच्या ४% ऑनलाईन मालमत्ता कर सवलत योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; १३,१४१ नागरिकांचा लाभ

पीसीएमसीच्या ४% ऑनलाईन मालमत्ता कर सवलत योजनेचा १३,१४१ मालमत्ताधारकांनी लाभ घेतला. २२ दिवसांत १५ कोटींचा ऑनलाईन कर भरणा.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी दि. २२) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने १ जुलै २०२६ पासून सुरू केलेल्या मालमत्ता करावरील ४ टक्के ऑनलाईन सवलत योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या २२ दिवसांत १३ हजार १४१ मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेत १५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर ऑनलाईन भरला (Pcmc Property Tax)आहे.

 

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे, नागरिकांचा वेळ वाचावा आणि मालमत्ता कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, या उद्देशाने महापालिकेने ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर ४ टक्के सवलत लागू केली (Pcmc Property Tax) आहे.

 

१ एप्रिल ते २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत महापालिकेकडे एकूण ५४७ कोटी ९ लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. १ जुलैपासून सुरू झालेल्या सवलत योजनेमुळे ऑनलाईन कर भरण्याकडे नागरिकांचा वाढता कल दिसून येत(Pcmc Property Tax) आहे.

 

योजनेची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी महापालिका सोशल मीडिया, जनजागृती संदेश, व्हिडिओ तसेच मोबाईल एसएमएसच्या माध्यमातून व्यापक प्रचार मोहीम राबवत आहे. दररोज सुमारे १ ते ३ लाख मालमत्ताधारकांना एसएमएसद्वारे सवलत योजनेची माहिती पाठवून वेळेत ऑनलाईन कर भरण्याचे आवाहन करण्यात येत (Pcmc Property Tax) आहे.

 

महापालिकेने ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत उपलब्ध असलेल्या ४ टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी उर्वरित मालमत्ताधारकांनीही विलंब न करता ऑनलाईन मालमत्ता कर भरावा, असे आवाहन केले (Pcmc Property Tax) आहे.

 

कोट :

“पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मालमत्ता कराचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना ४ टक्के सवलत उपलब्ध आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेत वेळेत कर भरून शहराच्या विकासात योगदान द्यावे.”

— रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

 

कोट :

“मालमत्ता कराच्या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीसह नियमानुसार कारवाई केली जात आहे. त्यामुळे ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन कर भरून ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा आणि पुढील कारवाई टाळावी.”

— सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00