प्रतिनिधी :संस्कार भारती पश्चिम प्रांत, पिंपरी-चिंचवड समितीच्या वतीने आयोजित “अभिव्यक्ती – कला महोत्सव २०२६” हा भव्य सांस्कृतिक सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात संपन्न झाला. निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडलेल्या या महोत्सवाला कला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी उपस्थिती (Abhivyakti Kala Mahotsav) लावली.
महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध नाटक व चित्रपट अभिनेते सुनील बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, संस्कार भारतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सतीश कुलकर्णी तसेच पश्चिम प्रांत सहमंत्री विनायक माने यांची प्रमुख उपस्थिती (Abhivyakti Kala Mahotsav)लाभली.

दिवसभर रंगलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. व्याख्यान सत्र, कथक नृत्य सादरीकरण, शास्त्रीय गायन तसेच विविध कलाविष्कारांनी रसिकांना समृद्ध अनुभव दिला. नामवंत कलाकारांच्या दमदार सादरीकरणामुळे कार्यक्रमाची शोभा अधिक खुलून (Abhivyakti Kala Mahotsav) दिसली.
संपूर्ण महोत्सवात शिस्तबद्ध नियोजन, दर्जेदार सादरीकरण आणि सांस्कृतिक वैभव यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. आयोजकांच्या परिश्रमामुळे हा महोत्सव सर्वांसाठी संस्मरणीय(Abhivyakti Kala Mahotsav) ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अध्यक्ष डॉ. पं. नंदकिशोर कपोते, सचिव सौ. लीना आढाव तसेच महोत्सव समितीतील सर्व सदस्यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात (Abhivyakti Kala Mahotsav) आले.
महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या सहकार्यामुळे या महोत्सवाला अधिक भव्य आणि दिमाखदार स्वरूप प्राप्त(Abhivyakti Kala Mahotsav) झाले.
