Home तंत्रज्ञान Rakshak Chauk Flyover :रक्षक चौक उड्डाणपूल वाहतुकीस खुला; आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश

Rakshak Chauk Flyover :रक्षक चौक उड्डाणपूल वाहतुकीस खुला; आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपळे निलख येथील रक्षक चौकातील उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेने निर्णय घेत नागरिकांना मोठा दिलासा दिला.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपळे निलख येथील रक्षक चौकातील उड्डाणपूल अखेर सर्वसामान्य नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या मागणीची सकारात्मक दखल घेत महापालिकेने आवश्यक तांत्रिक व सुरक्षाविषयक प्रक्रिया पूर्ण करून हा पूल सार्वजनिक वापरासाठी सुरू केला. त्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडीचा दीर्घकालीन प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला असून नागरिकांना दिलासा मिळाला(Rakshak Chauk Flyover ) आहे.

 

रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण होऊनही तो वाहतुकीसाठी बंद असल्याने या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत होता. परिणामी स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन आमदार शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवत सुरक्षा ऑडिट आणि तांत्रिक तपासणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती. तसेच उड्डाणपूल शक्य तितक्या लवकर नागरिकांसाठी खुला करण्याबाबतही त्यांनी आग्रह धरला (Rakshak Chauk Flyover )होता.

 

आमदारांच्या या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने तत्काळ हालचाली करत सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या आणि पूल वाहतुकीसाठी सुरू केला. या उड्डाणपुलामुळे आता औंध ते सांगवी फाटा तसेच रावेत ते किवळे या मार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सिग्नलमुक्त झाला आहे. विशेष म्हणजे औंध बीआरटी मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मोठी मदत झाली (Rakshak Chauk Flyover )आहे.

 

याबाबत माहिती देताना महापालिकेच्या सहशहर अभियंता संध्या वाघ यांनी सांगितले की, पावसाळा तोंडावर असल्याने आणि पुलाखालील सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीची कामे सुरू असल्याने या परिसरात वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार शंकर जगताप यांनी पुल तातडीने खुला करण्याची मागणी केली होती. दरम्यान, आचारसंहितेमुळे औपचारिक उद्घाटन होऊ शकले नसल्याने हा प्रकल्प काही काळ प्रलंबित राहिला(Rakshak Chauk Flyover ) होता.

 

दरम्यान, सबवेच्या कामामुळे या मार्गावरील वाहतुकीला पर्यायी व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हा उड्डाणपूल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन अडचणींची दखल घेत प्रभावी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार शंकर जगताप यांचे नागरिकांनी कौतुक केले आहे. तसेच पूल तातडीने खुला केल्याबद्दल महापालिका प्रशासनाचेही वाहनचालक आणि रहिवाशांकडून आभार मानण्यात येत (Rakshak Chauk Flyover )आहेत.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00