Home माझं पिंपरी चिंचवड Advocate Bar Association:गरीब व दुर्बलांसाठी न्यायव्यवस्था आधारस्तंभ ; पिंपरीत न्यायाधीशांचा गौरवपूर्ण निरोप समारंभ

Advocate Bar Association:गरीब व दुर्बलांसाठी न्यायव्यवस्था आधारस्तंभ ; पिंपरीत न्यायाधीशांचा गौरवपूर्ण निरोप समारंभ

दीपक डोंगरे, व्ही. एन. गायकवाड आणि सौ. एम. ए. आवळे यांचा बार असोसिएशनतर्फे सत्कार ; ॲड. सतिश गोरडे यांचे गौरवोद्गार

by Admin
Spread the love

पिंपरी | दिनांक : ८ मे २०२६:पिंपरी-चिंचवड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर दीपक यू. डोंगरे, प्रथम वर्ग न्यायाधीश व्ही. एन. गायकवाड आणि सौ. एम. ए. आवळे यांच्या निरोप समारंभाचे आयोजन शुक्रवारी पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या सभागृहात करण्यात आले (Advocate Bar Association) होते.

 

यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ व बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सतिश गोरडे यांनी न्यायव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “न्यायाधीश आणि न्यायालयीन व्यवस्था ही लोककल्याणासाठी, विशेषतः गरीब व दुर्बल घटकांसाठी महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. संबंधित तिन्ही न्यायाधीशांनी आपल्या सेवाकाळात अत्यंत उत्कृष्ट कार्य केले आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी (Advocate Bar Association) काढले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश एस. एस. नायर होत्या. व्यासपीठावर एस. एस. चव्हाण, अल अमुदी, श्रीमती जी. जी. औटी, के. के. वाघमारे, श्रीमती ए. एल. आवटी, श्रीमती पी. डी. पाटील, श्रीमती एम. ए. आवळे, व्ही. एन. गायकवाड, श्रीमती टी. एस. महाडिक, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, ॲड. सतिश गोरडे, ॲड. सुशील मंचरकर आदी मान्यवर उपस्थित (Advocate Bar Association) होते.

 

दीपक यू. डोंगरे यांचा सन्मान अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांच्या हस्ते भक्ती-शक्ती प्रतिमा, संत तुकाराम महाराजांची पगडी व उपरणे देऊन करण्यात आला. व्ही. एन. गायकवाड यांचा सन्मान माजी अध्यक्ष ॲड. किरण पवार आणि ॲड. सुनील कडूसकर यांनी केला. तसेच सौ. एम. ए. आवळे यांचा सन्मान ॲड. संगीता परब, ॲड. कांता गोरडे आणि ॲड. सुजाता बीडकर यांच्या हस्ते करण्यात(Advocate Bar Association) आला.

 

यावेळी दीपक डोंगरे, ॲड. सुशील मंचरकर तसेच अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश संध्या एस. नायर यांनी मनोगते व्यक्त (Advocate Bar Association) केली.

 

कार्यक्रमाचे नियोजन ॲड. अनिल शिंदे, ॲड. अक्षय फुगे, ॲड. सोहेल शेख, ॲड. रवि मराठे, ॲड. शंकर घगाळे, ॲड. प्रशांत सस्ते, ॲड. भूषण पाटील आणि ॲड. सुशांत गोरडे यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. मंगेश खराबे यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष ॲड. अनिल पवार (Advocate Bar Association) यांनी केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00