Home आरोग्य llegal cable Death:अनधिकृत केबलच्या जाळ्यात गळा अडकून महिलेचा मृत्यू; महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

llegal cable Death:अनधिकृत केबलच्या जाळ्यात गळा अडकून महिलेचा मृत्यू; महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पिंपरी-चिंचवडमध्ये रस्त्यावर लोंबकळणाऱ्या अनधिकृत केबलमध्ये गळा अडकून संपदा पटवर्धन यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर महापालिकेच्या निष्काळजी कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : शहरातील रस्त्यांवर लोंबकळणाऱ्या अनधिकृत केबलमुळे झालेल्या अपघातात स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभागाच्या कोषाध्यक्षा संपदा संदीप पटवर्धन (वय ४८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत (llegal cable Death) मालवली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी संपदा पटवर्धन या स्कूटरवरून जात असताना रस्त्यावर लटकत असलेल्या इंटरनेट/केबल वायरमध्ये त्यांचा गळा अचानक अडकला. त्यामुळे वाहनावरील ताबा सुटून त्या खाली कोसळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मेंदूत रक्तस्राव झाला होता. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू (llegal cable Death)झाला.

 

त्यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार(llegal cable Death) आहे.

 

दरम्यान, शहरातील रस्त्यांवर इंटरनेट, वाय-फाय आणि डिश टीव्ही केबल्सचे धोकादायक जाळे पसरल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी केबल्स सैलपणे लटकत असून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात (llegal cable Death) आहे.

 

या घटनेनंतर अनधिकृत व धोकादायक केबल जंजाळ तात्काळ हटवावे तसेच जबाबदार अधिकारी आणि संबंधित केबल कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून आणि विशेषत: प्राधिकरण नागरिक मंडळाच्या वतीने करण्यात येत (llegal cable Death) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00