प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ई-ऑफिस प्रणालीतील डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम (DMS) प्रकल्पात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी महापौर रवी लांडगे आणि आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. सुरुवातीला १२ कोटी रुपयांचा असलेला हा प्रकल्प ११२ कोटींपर्यंत कसा गेला, याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली (PCMC DMS scam) आहे.
भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने प्रशासनात पारदर्शकता, गतिमानता आणि पेपरलेस कारभारासाठी १ एप्रिल २०२५ पासून ई-ऑफिस प्रणाली सुरू केली. या अंतर्गत ३५ विभागांचे दैनंदिन कामकाज ऑनलाइन करण्यात आले. कागदपत्रांचे स्कॅनिंग, ट्रॅकिंग, सामायिकरण आणि शोधासाठी DMS प्रणालीचा वापर सुरू झाला. अधिकारी व कर्मचाऱ्यांना डिजिटल स्वाक्षरी की देखील देण्यात (PCMC DMS scam)आल्या.
मात्र, प्रणाली सुरू झाल्यानंतर अवघ्या एका वर्षातच वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या पाचपैकी तीन सर्व्हर बंद असल्याने कामकाजावर मोठा परिणाम होत असून अनेक फाईली प्रलंबित राहत आहेत. दुपारनंतर प्रणाली बंद पडत असल्याने महापालिकेत पुन्हा कागदी फाईलींचा वापर सुरू झाल्याचेही त्यांनी म्हटले (PCMC DMS scam)आहे.

या पार्श्वभूमीवर सुरुवातीचा खर्च तब्बल ११२ कोटींपर्यंत कसा वाढला, निविदा प्रक्रिया पारदर्शक होती का, स्पर्धात्मक निविदा मागवण्यात आल्या होत्या का, मंजूर व नामंजूर निविदांचा तपशील काय आहे, तसेच संबंधित एजन्सीचा तत्कालीन अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांशी काही संबंध आहे का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली (PCMC DMS scam)आहे.
या प्रकल्पामुळे प्रशासन अधिक कार्यक्षम होण्याऐवजी नागरिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही भापकर यांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली(PCMC DMS scam) आहे.
