Home तंत्रज्ञान Ravet Local Issue :रावेतच्या लक्ष्मीनगरचा रस्ता मार्गी लावा; नगरसेवक निलेश तरस यांची आयुक्तांकडे आक्रमक मागणी

Ravet Local Issue :रावेतच्या लक्ष्मीनगरचा रस्ता मार्गी लावा; नगरसेवक निलेश तरस यांची आयुक्तांकडे आक्रमक मागणी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रावेतच्या लक्ष्मीनगर भागातील १८ मीटर डीपी रस्ता २५ वर्षांपासून रखडला आहे. नगरसेवक निलेश तरस यांनी आयुक्तांकडे तातडीने रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रावेत येथील लक्ष्मीनगर भागातील रहिवाशांना गेल्या २५ वर्षांपासून मूलभूत रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. परिसरातील मोकळ्या भूखंडांना मालकांनी कुंपण घातल्याने येथील वहिवाट पूर्णपणे बंद झाली असून, रस्ता नसल्यामुळे वृद्ध, महिला आणि शालेय मुलांचे प्रचंड हाल होत आहेत. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख निलेश गुलाब तरस यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन देत १८ मीटरचा नियोजित ‘डीपी’ रस्ता तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली (Ravet Local Issue) आहे.

२५ वर्षांपासूनची वस्ती रस्त्याविना

मौजे रावेत येथील सर्व्हे क्रमांक १४२, १४३ आणि १४४ मधील लक्ष्मीनगर भागात सुमारे दोनशे नागरिकांची वस्ती आहे. महापालिकेने रावेत परिसरातील इतर सर्व डीपी रस्ते पूर्ण केले असताना, याच भागातील रस्ता रखडल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पूर्वी रहिवासी खासगी मोकळ्या भूखंडांतून ये-जा करत होते; मात्र आता त्या जागांवर पत्र्यांचे कंपाऊंड उभारण्यात आल्याने नागरिकांची कोंडी झाली(Ravet Local Issue) आहे.

रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची वाट अडली

रस्ता नसल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाची गाडी संबंधित भागात पोहोचू शकत नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गर्भवती महिला तसेच आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेणे अत्यंत जिकिरीचे ठरत आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होते. अपंग व्यक्ती आणि लहान मुलांची मोठी गैरसोय होत असल्याचे निलेश तरस यांनी निवेदनात नमूद केले (Ravet Local Issue) आहे.

प्रशासकीय दिरंगाईवर तरस यांचा प्रहार

या रस्त्यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी २०१४, २०१७ आणि २०२५ मध्येही महापालिका प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा रस्ता अद्याप कागदावरच राहिल्याची खंत व्यक्त केली जात (Ravet Local Issue) आहे.

“नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि दैनंदिन अडचणींचा विचार करून १८ मीटरचा हा रस्ता प्राधान्याने पूर्ण करावा; अन्यथा प्रशासनाला रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,” असा इशाराही निलेश तरस यांनी दिला (Ravet Local Issue) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00