Home प्रेरणा / यशकथा Mahesh Landge : वाढदिवस अभिष्ठचिंतन सोहळा | 100 हून अधिक सामाजिक उपक्रम |

Mahesh Landge : वाढदिवस अभिष्ठचिंतन सोहळा | 100 हून अधिक सामाजिक उपक्रम |

आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन. सफाई आणि घरकामगार माता-भगिनींचा सन्मान, रक्तदान व आरोग्य शिबिरे, हिंदुभूषण क्रीडा महोत्सव आणि हजारोंचा सहभाग.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी – गेली 25 वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे महिनाभर साजरे होणे ही एक विलक्षण गोष्ट आहे. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. यावर्षीचा वाढदिवस सफाई व घरकामगार माता-भगिनींना समर्पित केला. त्यांचा सन्मान करताना विशेष आनंद झाला. माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत कष्टकऱ्यांचा गौरव करण्यात आला आणि विधायक पद्धतीने अभिष्ठचिंतन पार पडले. या समारंभातून समर्पित भावनेतून समाजसेवा करण्यासाठी आणखी सकारात्मक ऊर्जा मिळाली, अशी भावनिक प्रतिक्रिया आमदार महेश लांडगे यांनी दिली.

 

भोसरी येथील ऐतिहासिक गावजत्रा मैदानावर वाढदिवस अभिष्ठचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो नागरिकांनी येथे उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला. महिनाभराच्या कालावधीत भोसरी विधानसभा, शहर आणि ग्रामीण भागात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक असे 100 हून अधिक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांमुळे पिंपरी-चिंचवड शहरात उत्सवमय वातावरण निर्माण झाले होते.

 

या आनंददायी प्रसंगी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, स्थानिक मित्रपरिवार तसेच राज्यस्तरीय अनेक मान्यवरांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले तसेच कॅबिनेट मंत्री, विधान परिषदेचे सदस्य, आमदार आणि शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व औद्योगिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी लांडगे यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

महिनाभरात आयोजित रक्तदान शिबिरे आणि आरोग्य शिबिरांमधून 2 हजारांहून अधिक पिशव्या रक्तसंकलन झाले. 10 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी आरोग्य शिबिरांमधील सेवांचा लाभ घेतला. महिलांसाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रबोधनात्मक उपक्रमांमुळे शहरात उत्साहाचे वातावरण होते. विशेषत: हिंदुभूषण क्रीडा महोत्सवामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात सुमारे 10 हजार युवक-युवतींनी सहभाग नोंदवून क्रीडाक्षेत्रात भर टाकली. यावर्षीचा वाढदिवस सफाई व घरकामगार माता-भगिनींना समर्पित करण्यात आला. या निमित्त 4 हजार 320 महिलांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले.

 

 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 2014 पासून शहरात सकारात्मक ऊर्जेने काम करण्याची संधी मिळाली. माय-बाप पिंपरी-चिंचवडकरांनी ठेवलेला विश्वास हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. माझे सहकारी आणि मित्रपरिवार यांनी या सामाजिक कार्याचा वसा जपला आहे. या सामाजिक उत्सवामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये समाजाभिमुख कार्याची नवी परिभाषा आकाराला आली आहे. पुढील काळात देव, देश, धर्म आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी तसेच शहराच्या शाश्वत विकासासाठी समर्पित भावनेने कार्यरत राहीन.

 

– महेश लांडगे

आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे

 

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00