Home गुन्हे prostitution business:निगडीतील लॉजवर पोलिसांचा छापा, एका पीडित महिलेची सुटका

prostitution business:निगडीतील लॉजवर पोलिसांचा छापा, एका पीडित महिलेची सुटका

निगडी परिसरातील साईकृपा लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली. मॅनेजर असलम इलाही शेख याला अटक, लॉज मालक आणि एका महिलेविरोधात गुन्हा नोंदवला.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:निगडी परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकत एका पीडित महिलेची सुटका केली. ही कारवाई मंगळवारी (दि. २०) रात्री करण्यात ( prostitution business) आली.

या प्रकरणी पोलिस अंमलदार गणेश कारोटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रान्सपोर्टनगर येथील साईकृपा लॉजचा मॅनेजर असलम इलाही शेख (वय २४, रा. निगडी, मूळ रा. निलंगा, जि. लातूर) याला अटक केली आहे. तसेच लॉज मालक अशोक भिकाजी काळे (रा. निगडी) आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला  ( prostitution business) आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. या व्यवसायातून मिळालेल्या रकमेवर ते आपली उपजीविका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले  ( prostitution business) आहे.

या बाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ छापा टाकून कारवाई केली आणि पीडित महिलेची सुटका केली. या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत  ( prostitution business) आहेत.



Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00