(विवेक कुलकर्णी )आयसीसी टी -20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार फलंदाजीचा नमुना सादर करत इंग्लंड संघासमोर 254 धावांचे भलेमोठे लक्ष्य ठेवले आहे. नॉकआऊट सामन्यातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली असून भारतीय संघाने 19 षटकार आणि 18 चौकारांचा पाऊस पाडत इतिहास (England vs India) घडवला.
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीलाच अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाल्याने इंग्लंडचा निर्णय योग्य ठरतो की काय अशी चिन्हे दिसू लागली. मात्र त्यानंतर मैदानात उतरलेल्या संजू सॅमसन याने पुन्हा एकदा आपला आक्रमक अंदाज दाखवून (England vs India) दिला.
वेस्ट इंडिजविरुद्ध अविस्मरणीय खेळी करणाऱ्या सॅमसनने आजही तोच फॉर्म कायम ठेवत अवघ्या 42 चेंडूत 89 धावांची तुफानी खेळी साकारली. त्याच्या खेळीत 7 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. शतकाकडे वाटचाल करत असतानाच तो 89 धावांवर बाद झाला, पण तोपर्यंत भारतीय डावाची भक्कम पायाभरणी झाली (England vs India) होती.
यानंतर शिवम दुबे याने 43 धावांची स्फोटक खेळी करत इंग्लिश गोलंदाजांवर दडपण कायम ठेवले. कर्णधार सूर्याकुमार यादव आज मोठी खेळी करू शकला नाही, मात्र मधल्या फळीत तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी तुफानी फटकेबाजी करत धावगती वाढवली. अखेरीस भारतीय संघाने 20 षटकांत 253 धावा फलकावर उभ्या करत इंग्लंडसमोर 254 धावांचे आव्हान (England vs India) ठेवले.
भारतीय फलंदाजांनी केलेली आक्रमक फलंदाजी, मोठ्या सामन्यात दाखवलेले धैर्य आणि शेवटपर्यंत टिकवलेली धावगती यामुळे हा डाव विशेष ठरला. नॉकआऊट सामन्यात इतकी मोठी धावसंख्या उभारणे ही मोठी कामगिरी मानली जात(England vs India) आहे
दरम्यान, शेवटची बातमी मिळाली तेव्हा इंग्लंडने 5 षटकांत 2 गडी गमावत 38 धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच अचूक मारा करत इंग्लंडला दबावाखाली ठेवले(England vs India) आहे.
सध्या तरी भारतीय संघाचे पारडे जड दिसत असले, तरी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पुढील दीड-दोन तासांत सामन्याचे चित्र स्पष्ट होईल. मात्र आज भारतीय संघाने केलेली फलंदाजी चाहत्यांच्या कायम स्मरणात राहील,(England vs India) हे निश्चित.
