Home पुणे PCMC Poll Alliance:पिंपरी : स्थानिक निवडणुकांसाठी युतीच्या हालचालींना वेग

PCMC Poll Alliance:पिंपरी : स्थानिक निवडणुकांसाठी युतीच्या हालचालींना वेग

by Admin
Spread the love

पिंपरी, ता. १९ – पिंपरी-चिंचवडसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा सुरू केली असून, इच्छुकांवर अन्याय होऊ नये याची खबरदारी घेत युतीचा प्रस्ताव पुढे नेला जात आहे. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार असल्याची माहिती पक्षस्तरावरून ( PCMC Poll Alliance) देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणुकीसाठी तयारी गतीने सुरू केली असून, अनेक वर्षांपासून रखडलेली नवी कार्यकारिणी जाहीर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नव्या कार्यकारिणीत ज्येष्ठ आणि तरुण पदाधिकाऱ्यांचा संतुलित समावेश करण्यात येत असून, गटबाजी टाळण्यावर भर दिला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीमकडून प्रभागनिहाय सर्व्हे सुरू असून स्थानिक नेतेदेखील त्यात सक्रिय ( PCMC Poll Alliance) सहभागी आहेत.

२० ते २५ नोव्हेंबरपर्यंत पक्षाने इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. अनेक प्रभागांत दोन ते तीन इच्छुक पुढे येत आहेत. आरक्षणात करण्यात आलेल्या अलीकडील बदलांमुळे काही प्रभागांत नव्या इच्छुकांचा शोध घेतला जात आहे. अंतिम निवड प्रक्रियेत नाराजी ( PCMC Poll Alliance) टाळण्यासाठी सर्व्हेला विशेष महत्त्व दिले जात आहे.

अजित पवार यांनी नियुक्त केलेल्या स्वतंत्र पथकाने क्षेत्रभेटी सुरू केल्या आहेत. प्रभागातील राजकीय समीकरणे, मतदारांचा संभाव्य कल, प्रतिस्पर्धी पक्षांची ताकद आणि विजयाची संधी यांचे सविस्तर निरीक्षण या पथकाकडून केले जात आहे. सर्व्हेच्या अहवालानंतर पक्षनेते एकत्र बसून उमेदवारांची प्राथमिक यादी तयार करतील आणि अंतिम मान्यता ( PCMC Poll Alliance)पवार यांच्याकडून घेतली जाईल.

महाविकास आघाडीसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युतीबाबतही चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत ( PCMC Poll Alliance)आहेत.

शहराध्यक्ष योगेश बहल यांनी प्रभागनिहाय सर्व्हे सुरू असून त्यानुसार सक्षम उमेदवारांची निवड केली जाईल, असे सांगितले. तर खासदार श्रीरंग बारणे यांनी अद्याप निवडणुकीची तारीख घोषित नसल्याने कोणत्याही पक्षाशी औपचारिक चर्चा झालेली ( PCMC Poll Alliance) नसल्याचे स्पष्ट केले.

 

https://youtu.be/FU1FAhet7FE?si=FaatPV_L-n2sz1I3


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00