भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. माजी महापौर संजोग वाघेरे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्यामुळे दुखावलेल्या संदीप वाघेरे यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सोमवारी (दि. २२) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक प्रमुख नाना काटे (Breaking News) उपस्थित होते.
२०१७ साली झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत पिंपरीतील प्रभाग क्रमांक २१ मधून संदीप वाघेरे भाजपकडून निवडून आले होते. त्यांनी त्यावेळी विरोधी उमेदवार प्रभाकर वाघेरे यांचा पराभव केला होता. मात्र आता त्याच प्रभाकर वाघेरे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला असून, आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचे आश्वासनही देण्यात आल्याची माहिती (Breaking News) आहे.
याचबरोबर माजी महापौर संजोग वाघेरे तसेच त्यांच्या पत्नी व माजी नगरसेविका उषा वाघेरे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्व पक्षप्रवेशांना संदीप वाघेरे यांनी तीव्र विरोध केला (Breaking News) होता.
निवडून आल्यानंतर संदीप वाघेरे यांनी आपल्या प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली होती. या विकासकामांच्या जोरावर भाजपचे पॅनल विजयी करू, असा विश्वास त्यांनी पक्षश्रेष्ठींना व्यक्त केला होता. मात्र स्थानिक पातळीवरील प्रमुख विरोधकांनाच पक्षात स्थान देण्यात आल्याने ते नाराज (Breaking News) झाले.
या पार्श्वभूमीवर संदीप वाघेरे यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात (Breaking News) आहे.
