Home माझं पिंपरी चिंचवड Pcmc Election 2026:पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : बीड व कोल्हापूरहून ईव्हीएम यंत्रे सुरक्षितरीत्या दाखल

Pcmc Election 2026:पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : बीड व कोल्हापूरहून ईव्हीएम यंत्रे सुरक्षितरीत्या दाखल

१५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानासाठी चार वाहनांच्या ताफ्यातून ईव्हीएम व निवडणूक साहित्य पिंपरीत; कडेकोट पोलिस बंदोबस्तात स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित साठवण

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम यंत्रे व निवडणूक अनुषंगिक साहित्य महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बीड व कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित तालुक्यांतून पिंपरी येथे सुरक्षितरीत्या आणण्यात आले (Pcmc Election 2026)आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम यंत्रे व निवडणूक अनुषंगिक साहित्य महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बीड व कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित तालुक्यांतून पिंपरी येथे सुरक्षितरीत्या आणण्यात आले (Pcmc Election 2026)आहे.

यामध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई, पाटोदा व आष्टी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, आजरा, कागल, भुदरगड, गडहिंग्लज व चंदगड येथील ईव्हीएम यंत्रांचा समावेश आहे. हे साहित्य चार स्वतंत्र वाहनांच्या ताफ्यामध्ये, पूर्वनियोजित मार्ग व नकाशानुसार पिंपरी येथे आणण्यात (Pcmc Election 2026) आले.

या संपूर्ण कामकाजासाठी नियुक्त नोडल अधिकारी प्रमोद ओंभासे यांच्यासह सहाय्यक नोडल अधिकारी सुनील पवार, अभिमान भोसले, संतोष कुदळे, राहुल पाटील व इंद्रजीत जाधव यांच्या समन्वयाने सुमारे २७ महापालिका कर्मचारी, १२ व्हिडिओ कॅमेरामन व १६ सशस्त्र पोलिस कर्मचारी असा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला (Pcmc Election 2026) होता.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या सुसज्ज स्ट्राँग रूममध्ये ही सर्व ईव्हीएम यंत्रे सुरक्षित ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी स्थानिक राजकीय पक्षांचे नियुक्त पदाधिकारी यांना पुर्वसुचना देऊन नियमानुसार पाहणीसाठी बोलविण्यात आले ( Pcmc Election 2026) होते.

सर्व वाहनांच्या सीलबंद स्थितीची उपस्थित पोलिस अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या समक्ष खातरजमा करून सील उघडण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम यंत्रे स्ट्राँग रूम अधिकारी संजय काशिद, सत्वशील शितोळे व इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरक्षितरीत्या उतरविण्यात आली. सध्या सर्व ईव्हीएम यंत्रे निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार सीलबंद स्थितीत सुरक्षित ठेवण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यात आली (Pcmc Election 2026) आहे.

 

https://youtube.com/watch?v=5W-VsDyqfMk&si=l1J_GmFbHVoyyNzQ

Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00