Home गुन्हे Pimpri Spa Raid:पिंपरीत ‘रिच फील स्पा’वर पोलिसांचा छापा; ३ महिलांची सुटका, मॅनेजर अटकेत

Pimpri Spa Raid:पिंपरीत ‘रिच फील स्पा’वर पोलिसांचा छापा; ३ महिलांची सुटका, मॅनेजर अटकेत

पिंपरी-चिंचवडमध्ये स्पाच्या आड सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटवर पोलिसांची कारवाई. ‘रिच फील स्पा’वर छापा टाकून ३ महिलांची सुटका, मॅनेजर अटक.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : शहरात स्पा आणि मसाज पार्लरच्या आड सुरू असलेल्या अवैध देहविक्री व्यवसायांवर पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. पिंपरीतील सम्राट चौक परिसरातील ‘रिच फील स्पा’वर छापा टाकून पोलिसांनी ३ पीडित महिलांची सुटका केली असून स्पा मॅनेजरला अटक केली             (Pimpri Spa Raid) आहे.

 

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २५ मार्च रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. मसाजच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे तपासात निष्पन्न (Pimpri Spa Raid)झाले.

 

या प्रकरणात स्पा चालक मयूर दिनेश मोहिते (रा. दिघी) आणि मॅनेजर अक्षय महादेव सुतार (वय २६, रा. निगडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अक्षय सुतार याला अटक केली असून भारतीय न्याय संहिता आणि पिटा (PITA) कायद्यान्वये पुढील कारवाई सुरू(Pimpri Spa Raid) आहे.

 

शहरातील अशा अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या तीन वर्षांत स्पा, हॉटेल आणि रहिवासी भागांच्या आड सुरू असलेल्या २९ आस्थापनांवर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. चालू वर्षातही आतापर्यंत ३ ठिकाणी अशी कारवाई करण्यात आली(Pimpri Spa Raid) आहे.

 

दरम्यान, यावर्षी AHTU पथकाने आतापर्यंत ८ ठिकाणी छापे टाकून २० आरोपींना अटक केली असून १७ महिलांची सुटका करण्यात आली (Pimpri Spa Raid) आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि बसवराज तेली, तसेच गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, महिला सहाय्यक निरीक्षक वैशाली शेंडगे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी(Pimpri Spa Raid) केली.

 

पोलीस प्रशासनाने इशारा दिला असून शहरातील इतर संशयास्पद आस्थापनांवरही लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार (Pimpri Spa Raid) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00