Home माझं पिंपरी चिंचवड Pcmc School Reopening:१५ जूनपासून महापालिकेच्या शाळा पुन्हा गजबजणार; ‘शाळा प्रवेश उत्सवा’त विद्यार्थ्यांचे होणार स्वागत

Pcmc School Reopening:१५ जूनपासून महापालिकेच्या शाळा पुन्हा गजबजणार; ‘शाळा प्रवेश उत्सवा’त विद्यार्थ्यांचे होणार स्वागत

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. शाळा प्रवेश उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी : उन्हाळी सुट्टीनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळा सोमवार, दि. १५ जूनपासून पुन्हा सुरू होत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी महापालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली असून इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘शाळा प्रवेश उत्सव’ उत्साहात साजरा केला जाणार(Pcmc School Reopening) आहे.

 

या निमित्ताने महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. नव्या विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पगुच्छ देऊन स्वागत तसेच शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार (Pcmc School Reopening)आहे.

 

विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी बालभारतीची मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार असून अभ्यासक्रमाची सुरुवात तत्काळ होण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले (Pcmc School Reopening)आहे.

 

नवीन शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू व्हावे यासाठी शाळांची स्वच्छता, वर्गखोल्यांची तयारी, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, डिजिटल शिक्षण साहित्य आणि अन्य मूलभूत सुविधांची तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने (Pcmc School Reopening)दिली.

 

महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पालकांना आपल्या पाल्यांना महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश देण्याचे तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन केले (Pcmc School Reopening)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00