Home माझं पिंपरी चिंचवड Mahesh Landge:पंतप्रधान मोदींच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त भोसरीत जनकल्याण शिबिर; विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली

Mahesh Landge:पंतप्रधान मोदींच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त भोसरीत जनकल्याण शिबिर; विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली

आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने भोसरी येथे १५ ते १७ जून २०२६ दरम्यान जनकल्याण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ई-श्रम कार्ड, आयुष्मान भारत, सुकन्या समृद्धी योजना, ABHA कार्ड आणि पिंक ई-रिक्षा योजनेची माहिती व नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त भोसरी येथे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने तीन दिवसीय भव्य जनकल्याण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती, नोंदणी आणि लाभ मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार (Mahesh Landge)आहे.

 

हे शिबिर सोमवार, दि. १५ जून ते बुधवार, दि. १७ जून २०२६ या कालावधीत सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आमदार महेश लांडगे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय, शितलबाग, पुणे-नाशिक रोड, भोसरी येथे होणार (Mahesh Landge)आहे.

 

शिबिरामध्ये ई-श्रम कार्ड नोंदणी, आयुष्मान भारत (PM-JAY) आरोग्य कार्ड, ABHA हेल्थ अकाउंट, प्रधानमंत्री मानधन योजना, सुकन्या समृद्धी योजना तसेच आयुष्मान भारत कुटुंब कार्ड यांसह विविध योजनांचा लाभ नागरिकांना घेता येणार (Mahesh Landge) आहे.

 

यासोबतच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष ‘पिंक ई-रिक्षा योजना’ही राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत केवळ पाच हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर ई-रिक्षा उपलब्ध होणार असून मोफत प्रशिक्षण, विमा, चार्जिंग लायसन्स तसेच दरमहा ३० हजार रुपयांहून अधिक उत्पन्नाची संधी उपलब्ध करून दिली जाणार (Mahesh Landge)आहे.

 

या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले (Mahesh Landge)आहे.

 

याबाबत बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले, “केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विकास, जनकल्याण, महिला सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचे काम सातत्याने सुरू (Mahesh Landge)आहे.”

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00