पिंपरी-चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यपूर्ती निमित्त भारतीय जनता पक्षातर्फे भोसरी विधानसभा मतदारसंघात विविध जनहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांतर्गत भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत निगडी परिसरात विकासकामांची पाहणी, स्वच्छता मोहीम आणि जनसंपर्क अभियान राबविण्यात (Jan Sampark Abhiyan) आले.
निगडी बस स्टॉप आणि भक्ती-शक्ती मेट्रो स्टेशन परिसरातील सुरू असलेल्या विविध विकासकामांची आमदार लांडगे यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी नागरिकांना उपलब्ध होत असलेल्या सुविधांचा आढावा घेण्यात (Jan Sampark Abhiyan)आला.
यानंतर अमृता विद्यालय ते साईनाथ नगर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेत परिसर स्वच्छतेचा संदेश (Jan Sampark Abhiyan)दिला.
सनराईज टॉवर्स कम्युनिटी हॉल येथे आयोजित जनसंपर्क अभियानात आमदार लांडगे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच स्थानिक समस्या आणि नागरिकांच्या सूचना जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन (Jan Sampark Abhiyan)दिले.
या कार्यक्रमांना भाजप पदाधिकारी, माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती (Jan Sampark Abhiyan)होती.
यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, “गेल्या 12 वर्षांत देशाने विकास, सुशासन आणि जनकल्याणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पिंपरी-चिंचवडच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू (Jan Sampark Abhiyan)राहतील.”
